नारळ न वापरता पांढरी चटणी करण्याची सोपी पद्धत; झटपट बनेल इडलीसोबत खाण्याची चटणी

Updated:May 10, 2026 23:28 IST2026-05-10T22:09:16+5:302026-05-10T23:28:19+5:30

Easy way to make white chutney without using coconut : एका छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जीरं, कढीपत्ता आणि हिंगाची खमंग फोडणी तयार करा.

नारळ न वापरता पांढरी चटणी करण्याची सोपी पद्धत; झटपट बनेल इडलीसोबत खाण्याची चटणी

नारळ न वापरता अगदी नारळाच्या चटणीसारखीच चव आणि पांढराशुभ्र रंग देणारी चटणी आपण भाजलेली डाळी किंवा शेंगदाणे वापरून करू शकता. ही चटणी चवीला उत्कृष्ट लागते आणि झटपट तयार होते. (Coconut Chutney Without Coconut)

नारळ न वापरता पांढरी चटणी करण्याची सोपी पद्धत; झटपट बनेल इडलीसोबत खाण्याची चटणी

अर्धी वाटी भाजलेली डाळवं किंवा सालं काढलेले भाजलेले शेंगदाणे घ्या. यामुळे चटणीला पांढरा रंग आणि दाटपणा येतो. चिरलेला पांढरा कांदा भाजून घ्या.

नारळ न वापरता पांढरी चटणी करण्याची सोपी पद्धत; झटपट बनेल इडलीसोबत खाण्याची चटणी

त्यात 2 ते 3 हिरव्या मिरच्या, आल्याचा एक छोटा तुकडा आणि चवीनुसार मीठ घाला.

नारळ न वापरता पांढरी चटणी करण्याची सोपी पद्धत; झटपट बनेल इडलीसोबत खाण्याची चटणी

नारळासारखा पांढरा रंग येण्यासाठी आंबट-गोड चवीनसाठी 2 चमचे ताजं दही मिसळू शकता.

नारळ न वापरता पांढरी चटणी करण्याची सोपी पद्धत; झटपट बनेल इडलीसोबत खाण्याची चटणी

एका छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, जीरं, कढीपत्ता आणि हिंगाची खमंग फोडणी तयार करा.

नारळ न वापरता पांढरी चटणी करण्याची सोपी पद्धत; झटपट बनेल इडलीसोबत खाण्याची चटणी

ही फोडणी चटणीवर ओता. तुमची नारळाशिवाय केलेली पांढरी चटणी तयार आहे. चटणीचा रंग पांढरा राहण्यासाठी त्यात लसूण किंवा जास्त कोथिंबीर घालणं टाळा. लसणामुळे चटणीला पिवळसर किंवा करडा रंग येऊ शकतो. तर कोथिंबीरीमुळे ती हिरवी होईल.

नारळ न वापरता पांढरी चटणी करण्याची सोपी पद्धत; झटपट बनेल इडलीसोबत खाण्याची चटणी

जर तुम्हाला चटणी अधिक शाही आणि क्रिमी हवी असेल तर तुम्ही डाळवांऐवजी 5 ते 6 काजू किंवा थोडे भाजलेले मखाने वापरू शकता. यामुळे चटणीला नैसर्गिक पांढरा शुभ्र रंग येतो आणि चवही हॉटेलच्या चटणीसारखी लागते.