एकच प्लाझो स्टाईल ८-उन्हाळ्यासाठी कम्फर्टेबल भन्नाट स्टायलिंग ट्रिकमुळे , लूक दिसेल लय भारी...

Updated:May 10, 2026 12:05 IST2026-05-10T12:00:40+5:302026-05-10T12:05:07+5:30

8 different ways to style palazzo pants : how to style palazzo pants for women : trendy palazzo styling ideas for casual and ethnic look : उन्हाळ्यात प्लाझो घालून स्टायलिश,कम्फर्टेबल लुक हवा असल्यास, पाहा स्टायलिंग आयडीया...

एकच प्लाझो स्टाईल ८-उन्हाळ्यासाठी कम्फर्टेबल भन्नाट स्टायलिंग ट्रिकमुळे , लूक दिसेल लय भारी...

उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकजणी कम्फर्टेबल, हलकंफुलकं आणि हवेशीर कपडे घालणं पसंत करते. अशावेळी पायघोळ प्लाझो हा अनेक महिलांच्या वॉर्डरोबमधला फेव्हरेट पर्याय ठरतो. चालायला सोपा, घालायला आरामदायक आणि दिसायलाही स्टायलिश असल्यामुळे प्लाझोची फॅशन कधीच आउट ऑफ ट्रेंड होत नाही. ऑफिसपासून ते कॅज्युअल आउटिंग, कॉलेज किंवा छोट्या फंक्शनपर्यंत प्लाझो सहज कॅरी करता येतो(how to style palazzo pants for women).

एकच प्लाझो स्टाईल ८-उन्हाळ्यासाठी कम्फर्टेबल भन्नाट स्टायलिंग ट्रिकमुळे , लूक दिसेल लय भारी...

मात्र अनेकदा “प्लाझोसोबत कोणता टॉप घालावा?”, “कसा स्टाईल करावा?” किंवा “नेहमीपेक्षा वेगळा लुक कसा मिळवावा?” असे प्रश्न पडतात. योग्य टॉप, ज्वेलरी आणि फुटवेअरसोबत प्लाझो स्टाईल केल्यास अगदी साधा लुकही खूप आकर्षक दिसू शकतो. जर तुम्हालाही उन्हाळ्यात प्लाझो घालून स्टायलिश आणि कम्फर्टेबल लुक मिळवायचा असेल, तर प्लाझोसोबत ट्राय करता येतील असे काही भन्नाट स्टायलिंग पर्याय पाहूयात(palazzo with different tops).

एकच प्लाझो स्टाईल ८-उन्हाळ्यासाठी कम्फर्टेबल भन्नाट स्टायलिंग ट्रिकमुळे , लूक दिसेल लय भारी...

१. उन्हाळ्याच्या कडाक्याच्या उन्हात अंगाला चिकटणारे कपडे नकोसे वाटतात आणि अशा वेळी हवेहवेसे वाटते ते म्हणजे सुटसुटीत, हवेशीर आणि स्टायलिश कपडे. म्हणूनच, सध्या फॅशनच्या जगात 'प्लाझो' (Palazzo) हा महिलांचा सर्वात आवडता आउटफिट बनला आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या हंगामात प्लाझो घालण्याला महिला अधिक पसंती देतात, कारण ते वजनाला हलके असते आणि त्यातून हवा खेळती राहते. प्लाझोची सर्वात मोठी खासियत म्हणजे तो पारंपारिक एथनिक आणि मॉडर्न वेस्टर्न अशा दोन्ही स्टाईलमध्ये सहज फिट होतो.

एकच प्लाझो स्टाईल ८-उन्हाळ्यासाठी कम्फर्टेबल भन्नाट स्टायलिंग ट्रिकमुळे , लूक दिसेल लय भारी...

हा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. उन्हाळ्यासाठी सुती लॉन्ग कुर्ती किंवा शॉर्ट कुर्तीसोबत मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट प्लाझो घालून तुम्ही एक स्टायलिश, आकर्षक लूक मिळवू शकता. एथनिक आणि एलिगंट लुकसाठी प्रिंटेड किंवा स्ट्रेट शॉर्ट कुर्ती प्लाझोसोबत परफेक्ट दिसते.

एकच प्लाझो स्टाईल ८-उन्हाळ्यासाठी कम्फर्टेबल भन्नाट स्टायलिंग ट्रिकमुळे , लूक दिसेल लय भारी...

जर तुम्हाला इंडो-वेस्टर्न लूक हवा असेल, तर हाय-वेस्टेड प्लाझोसोबत स्टाइलिश क्रॉप टॉप ट्राय करा. हा लूक पार्टी किंवा मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर जाण्यासाठी उत्तम आहे. रणरणत्या उन्हाळ्यात ट्रेंडी आणि यंग लुक हवा असेल तर क्रॉप टॉप आणि हाय-वेस्ट प्लाझो बेस्ट ऑप्शन आहे.

एकच प्लाझो स्टाईल ८-उन्हाळ्यासाठी कम्फर्टेबल भन्नाट स्टायलिंग ट्रिकमुळे , लूक दिसेल लय भारी...

ऑफिससाठी एक प्रोफेशनल लूक हवा असल्यास, प्लाझोवर एखादा सादा फॉर्मल शर्ट इन करून घाला. यावर एक स्लीक बेल्ट लावल्यास तुमचा लूक अधिक उठावदार दिसेल. कॉटन प्लाझोसोबत लूज फिट शर्ट घातल्यास क्लासी आणि कम्फर्टेबल लुक मिळतो.

एकच प्लाझो स्टाईल ८-उन्हाळ्यासाठी कम्फर्टेबल भन्नाट स्टायलिंग ट्रिकमुळे , लूक दिसेल लय भारी...

प्रवासात किंवा रोजच्या वापरासाठी टी-शर्टसोबत प्लाझो घालणे अतिशय आरामदायक असते. हे स्टायलिश दिसण्यासोबतच प्रचंड कम्फर्टेबल देखील असते.

एकच प्लाझो स्टाईल ८-उन्हाळ्यासाठी कम्फर्टेबल भन्नाट स्टायलिंग ट्रिकमुळे , लूक दिसेल लय भारी...

साधा टॉप आणि प्लाझोवर एखादा लांब श्रग किंवा एम्ब्रॉयडरी असलेले जॅकेट घालून तुम्ही तुमच्या लूकला एकदम क्लासी आणि ट्रेंडी लूक देऊ शकता. लॉन्ग श्रग किंवा जॅकेटसोबत सिंपल टॉप आणि प्लाझोवर फ्लोरल श्रग घातल्यास स्टायलिश लेयर्ड लुक तयार होतो.

एकच प्लाझो स्टाईल ८-उन्हाळ्यासाठी कम्फर्टेबल भन्नाट स्टायलिंग ट्रिकमुळे , लूक दिसेल लय भारी...

रणरणत्या उन्हात जर तुम्हाला अतिशय हलका, सुटसुटीत आणि 'कूल' लूक हवा असेल, तर टँक टॉप आणि प्लाझो हे बेस्ट आऊटफिट कॉम्बिनेशन आहे. टँक टॉप हे बाह्या नसलेले (Sleeveless) आणि शरीराला घट्ट बसणारे असतात, तर प्लाझो पायघोळ आणि हवेशीर असतात. या दोन्हीचे कॉम्बिनेशन तुम्हाला दिवसभर कम्फर्टेबल ठेवते. या लूकवर गळ्यात एखादे लांब स्टेटमेंट नेकलेस किंवा कानात मोठे हूप्स घातल्यास तुमचा लूक अधिक आकर्षक दिसेल.

एकच प्लाझो स्टाईल ८-उन्हाळ्यासाठी कम्फर्टेबल भन्नाट स्टायलिंग ट्रिकमुळे , लूक दिसेल लय भारी...

पेपलम टॉप आणि प्लाझोचे कॉम्बिनेशन फेमिनिन आणि पार्टी लूकसाठी एकदम बेस्ट आहे. पेपलम टॉप कंबरेपाशी घट्ट असतो आणि खालच्या बाजूला घेरेदार (flared) असतो, ज्यामुळे कंबरेचा भाग उठून दिसतो आणि एकदम परफेक्ट बॉडी शेप मिळतो. पेपलम टॉपसोबत पायघोळ प्लाझो घातल्यामुळे हालचाल करणे सोपे जाते आणि हा लूक स्टायलिश असण्यासोबतच दिवसभर वावरण्यासाठी अतिशय आरामदायी ठरतो.

एकच प्लाझो स्टाईल ८-उन्हाळ्यासाठी कम्फर्टेबल भन्नाट स्टायलिंग ट्रिकमुळे , लूक दिसेल लय भारी...

९. रणरणत्या उन्हाळ्यात स्टायलिश आणि कम्फर्टेबल राहण्यासाठी 'एकच प्लाझो ८ वेगवेगळ्या पद्धतीने' स्टाईल करण्याची ही भन्नाट ट्रिक नक्की ट्राय करा. टँक टॉपपासून ते पेपलम कुर्तीपर्यंतच्या या पर्यायांमुळे तुम्हाला दररोज नवा आणि फ्रेश लूक मिळेल, जो फॅशनसोबतच एकदम आरामदायी आणि कम्फर्टेबल देखील असेल.