Mothers Day 2026 : आईला काय आवडतं, विचारलंय कधी? करा फक्त १० गोष्टी, आई होईल खुश...
Updated:May 8, 2026 18:03 IST2026-05-08T17:49:27+5:302026-05-08T18:03:54+5:30
unique Mother’s Day special gift ideas for mothe : creative Mother’s Day celebration ideas at home : Mother’s Day gift ideas : मदर्स डे ला मोठं - महागडं गिफ्ट देण्यापेक्षा - पाहा सेलिब्रेशच्या स्पेशल भन्नाट आयडिया...

unique Mother’s Day special gift ideas for mother
आई... आपल्या आयुष्यातील अशी व्यक्ती जिच्याशिवाय संपूर्ण जगच अपूर्ण वाटतं. आपल्यासाठी दिवस-रात्र एक करणारी, स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून घरासाठी राबणाऱ्या आईसाठी खरं तर प्रत्येक दिवस हा 'मदर्स डे'च असतो. आपल्या आनंदासाठी कायम मेहनत करणाऱ्या आईसाठी हा दिवस खूप खास असतो. अनेकजण या दिवशी आईला महागडी गिफ्ट्स, सरप्राईज किंवा पार्टी देऊन तिचा दिवस खास बनवण्याचा प्रयत्न करतात. पण खरं सांगायचं तर, आईला आनंदी ठेवण्यासाठी नेहमी मोठ्या, महागड्या गोष्टींचीच किंवा सरप्राईज गिफ्ट्सची गरज असतेच असं नाही.
simple and thoughtful Mother’s Day surprise ideas
आईला तिच्या आवडीच्या छोट्या-छोट्या गोष्टींमधूनही खूप आनंद मिळू शकतो. प्रेमाने बोललेले काही शब्द, तिच्यासाठी केलेली छोटी मदत किंवा तिच्यासोबत घालवलेला थोडासा वेळही तिच्यासाठी एखाद्या मोठ्या गिफ्टपेक्षा कमी नसतो. कारण प्रत्येक आईसाठी तिच्या मुलांकडून मिळणारं प्रेम आणि आपुलकी हीच सर्वात मोठी भेट असते.
creative Mother’s Day celebration ideas at home
जर तुम्हालाही यंदाचा मदर्स डे आईसाठी खास करायचा असेल, तर काही छोट्या पण मनापासून केलेल्या गोष्टींच्या मदतीने तुम्ही तिच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य आणू शकता. कोणत्या छोट्या आणि सोप्या गोष्टी करून आईला खास पद्धतीने मदर्स डेच्या शुभेच्छा देता येतील याच्या काही खास भन्नाट आयडियाज पाहूयात.
१. तिच्या आवडीचा पदार्थ किंवा जेवणाचा बेत करा :-
नेहमी आई आपल्याला विचारते "आज काय बनवू?", आज तिला न विचारता तिच्या आवडीचा एखादा पदार्थ किंवा गोड बेत स्वतःच्या हाताने तयार करा. तुमच्या हाताची चव तिच्यासाठी कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलच्या जेवणापेक्षा भारी असेल.
२. सकाळचा चहा आणि नाश्ता तुम्ही तयार करा :-
आई दररोज सर्वांसाठी लवकर उठून चहा - नाश्ता तयार करते. या मदर्स डे ला तिला लवकर उठू देऊ नका. तिच्या आवडीचा गरमागरम चहा आणि नाश्ता स्वतः बनवून तिला 'बेड टी' सर्व्ह करा. हा छोटासा बदल म्हणजे तिच्यासाठी खूप मोठा आराम, आनंद आणि स्पेशल सरप्राईज असू शकतं.
३. तिची आवडती साडी भेट म्हणून द्या :-
कधी मॉलमध्ये गेल्यावर किंवा एखाद्या दुकानाच्या डिस्प्लेमध्ये एखादी साडी पाहून आईचं लक्ष तिथेच रेंगाळतं. "खूप छान आहे ना ही साडी?" असं ती म्हणते खरं, पण किंमत पाहून किंवा "कशाला हवीये आता साडी?" असं म्हणून ती स्वतःच्या मनाला आवर घालते. तिच्या याच न अपूर्ण राहिलेल्या इच्छेला या मदर्स डे ला पूर्ण करा. आईने पूर्वी कधीतरी आवडीने उल्लेख केलेली किंवा ज्या साडीला ती वारंवार बघत होती, ती साडी विकत आणून तिला भेट द्या.
४. हाताने लिहिलेलं पत्र किंवा कार्ड :-
आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सॲप मेसेजपेक्षा कागदावर तुमच्या हाताने लिहिलेल्या दोन ओळी आईला जास्त आनंद देतील. तिने तुमच्यासाठी जे केलं, त्याबद्दल तिचे आभार मानणारे एक छोटेसे पत्र लिहून तिच्या उशाशी ठेवा. स्वतः हाती बनवलेलं हँडमेड कार्ड, फोटो फ्रेम किंवा छोटंसं क्राफ्ट गिफ्ट तयार करा आणि तिला सरप्राईज गिफ्ट म्हणून द्या.
५. केसांत माळा प्रेमाने गजरा :-
साडीसोबत जेव्हा आई केसात मोगऱ्याचा किंवा अबोलीचा सुवासिक गजरा माळते, तेव्हा तिचं रूप अधिकच खुलून दिसतं. मदर्स डेच्या निमित्ताने आईसाठी खास सुवासिक मोगऱ्याचा गजरा घेऊन या. फक्त गजरा आणून देऊ नका, तर तिला समोर बसवून स्वतःच्या हाताने तो तिच्या केसात माळा. गजरा माळून झाल्यावर आईसोबत एक छानसा 'सेल्फी' किंवा फोटो काढायला विसरू नका. आईला सांगा, "आज तू खूप सुंदर दिसत आहेस!" हे ऐकल्यावर तिच्या चेहऱ्यावर जो आनंद येईल तो तुमच्या कॅमेऱ्यात क्लिक करा. हा फोटो फ्रेम करून किंवा तिचा वॉलपेपर ठेवून तिला सरप्राईज द्या.
६. जुन्या आठवणींत आईसोबत रमून जा :-
मोबाईल बाजूला ठेवा आणि आईसोबत बसून जुने फोटो अल्बम पाहा. तिच्या बालपणीच्या, लग्नाच्या किंवा तुमच्या लहानपणीच्या गोष्टी तिच्याकडून ऐकून घ्या. तिला हे जाणून खूप आनंद होईल की तुम्हाला तिच्या आयुष्यात रस आहे.
७. सोबत एखादा चित्रपट पाहा :-
तिच्या आवडीचा जुना सिनेमा किंवा एखादा कार्यक्रम एकत्र बसून पाहा. सोबत पॉपकॉर्न किंवा तिचे आवडते स्नॅक्स ठेवा. हा 'क्वालिटी टाइम' तिच्यासाठी सर्वात मोठी भेट असेल.
८. घरकामात तिला मदत करा :-
तिला विचारण्यापेक्षा, स्वतःहून घरातील कामं उरकून घ्या. मग ते कपड्यांच्या घड्या घालणं असो, झाडं-लोट करणं असो किंवा भांडी घासणं. तिला दिवसभरासाठी घरकामातून सुट्टी द्या.
९. आईसोबतचा छोटासा फेरफटका मारा :-
आईचं आयुष्य बऱ्याचदा घराच्या चार भिंती, स्वयंपाकघर आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमध्येच अडकलेलं असतं. या मदर्स डे ला तिला या रोजच्या चक्रातून थोडा वेळ बाहेर काढा. आईला मोठ्या मॉलमध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी नेण्यापेक्षा, तिला मनापासून जिथे जायला आवडतं तिथे घेऊन जा. मग ते तिचं आवडतं जुने मंदिर असो, एखादी शांत बाग असो किंवा समुद्रकिनारा. तिला त्या वातावरणात शांतपणे फिरू द्या. तिच्याशी गप्पा मारत मारत मारलेला हा छोटासा फेरफटका तिला खूप मानसिक शांतता देऊन जाईल.
१०. थँक यू म्हणायला विसरू नका :-
आपण आयुष्यात कितीही मोठे झालो तरी आईसाठी कायम लहानच असतो. ती आपल्यासाठी जे काही करते, ते तिचं कर्तव्य आहे असं समजून आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो. पण या मदर्स डे ला फक्त 'हॅप्पी मदर्स डे' म्हणण्यापेक्षा तिला मनापासून 'थँक्यू' म्हणा. कधी एक प्रेमाची मिठीही आईसाठी खूप मोठा आनंद देऊन जाते.