झटपट-पटापट...चपात्या करण्याची ट्रिक व्हायरल! एकावेळी ४ चपात्या शेकून होतील, पाहा कशा ते
Updated:May 7, 2026 21:51 IST2026-05-07T21:42:39+5:302026-05-07T21:51:18+5:30
Viral Trick to Make More Chapatis in Less Time :

ही ट्रिक प्रामुख्याने कमी वेळेत जास्त चपात्या लाटण्यासाठी आहे. ज्यामुळे स्वंयपाकघरातील कामाचा ताण कमी होतो. (Viral Trick to Make More Chapatis in Less Time)
यात चपातीचे छोटे छोटे गोळे करून त्यांना थोडं लाटून एकावर एक ठेवलं जाते. (How To Make Chapati In Less Time)
प्रत्येक दोन लहान लाटलेल्या पुऱ्यांच्यामध्ये थोडं तेल आणि सुकं पीठ लावलं जात आहे. जेणेकरून त्या एकमेकांना चिटकणार नाहीत.
५ ते ६ पुऱ्यांचा एक थर तयार करून तो मोठ्या आकारात पातळ लाटला जातो.
ही मोठी लाटलेली चपाती तव्यावर घातली जाते आणि ती भाजत असताना एक-एक पदर सहज वेगळा होतो.
या पद्धतीनं केलेल्या चपात्या अतिशय पातळ आणि कागदासारख्या मऊ होतात. ज्या बराचवेळ मऊ राहतात.
जेव्हा घरी पाहूणे येतात किंवा घरातील माणसांची संख्या जास्त असते तेव्हा ही पद्धत अत्यंत फायदेशीर ठरते.
एकाचवेळी अनेक चपात्या भाजल्या जात असताना गॅसची देखील बचत होते. ही ट्रिक यशस्वी होण्यासाठी पीठ मळणं आणि तेलाचा योग्य वापर करण्याचे थोडे कौशल्य असणं आवश्यक आहे.