'राजा शिवाजी' चित्रपटातील 'फूल पारिजात' गाणं प्रदर्शित; अजय-अतुलच्या संगीताची जादू लावतेय वेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 18:52 IST2026-05-07T18:51:03+5:302026-05-07T18:52:04+5:30

'राजा शिवाजी' या ऐतिहासिक चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त घोडदौड सुरू आहे.

Raja Shivaji Movie Phool Parijat Song Release Ajay Atul Shreya Ghoshal Riteish Deshmukh | 'राजा शिवाजी' चित्रपटातील 'फूल पारिजात' गाणं प्रदर्शित; अजय-अतुलच्या संगीताची जादू लावतेय वेड

'राजा शिवाजी' चित्रपटातील 'फूल पारिजात' गाणं प्रदर्शित; अजय-अतुलच्या संगीताची जादू लावतेय वेड

रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' या ऐतिहासिक चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त घोडदौड सुरू आहे. १ मे रोजी, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना सिनेमागृहांकडे खेचून आणले आहे. विशेष म्हणजे महाराणी सईबाई आणि राजे शिवाजी यांच्यातील प्रेम आणि आदर अधोरेखित करणारं 'फूल पारिजात' हे गाणं  प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. आता हे गाणं अधिकृतरित्या प्रदर्शित झालं आहे. हे गाणं ऐकताच क्षणी अंगावर काटा येतो आणि प्रत्येकाच्या अंतर्मनाला हे स्पर्शून जातं.

नेहमीच रणांगणावरील पराक्रम आणि रणनीतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवरायांची एक संवेदनशील, भावनिक आणि प्रेमळ बाजू या गाण्यातून समोर आली आहे. सईबाईंच्या नजरेतून उलगडणारे महाराजांचे हे कोमल रूप प्रेक्षकांना एका वेगळ्याच भावनिक विश्वात घेऊन जातं. युद्ध आणि स्वराज्याच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, हे गाणे चित्रपटात एक सुखद आणि हळवा क्षण निर्माण करणार आहे. 

अजय-अतुल आणि श्रेया घोषाल यांची जुगलबंदी
या गाण्याला दिग्गज संगीतकार अजय-अतुल यांचे सुरेल संगीत लाभले आहे. अत्यंत शांत, अभिजात आणि भावपूर्ण शैलीत  हे गाणे सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने आपल्या मधुर आवाजात गायले आहे. 

'राजा शिवाजी' या चित्रपटात दिग्गज आणि बहुआयामी कलाकारांची फळी एकत्र आली आहे. यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख यांचा समावेश आहे.

Web Title : 'राजा शिवाजी' का 'फूल पारिजात' गाना रिलीज; अजय-अतुल का संगीत जादू बिखेरता है।

Web Summary : रितेश देशमुख की 'राजा शिवाजी' हिट है। महारानी साईबाई और शिवाजी महाराज के प्रेम को दर्शाने वाला गाना 'फूल पारिजात' अब रिलीज हो गया है। अजय-अतुल का संगीत और श्रेया घोषाल की आवाज एक मार्मिक अनुभव कराती है।

Web Title : 'Raja Shivaji's' 'Phool Parijaat' song released; Ajay-Atul's music enchants.

Web Summary : Riteish Deshmukh's 'Raja Shivaji' is a hit. The song 'Phool Parijaat,' showcasing the love between Maharani Saibai and Shivaji Maharaj, is now released. Ajay-Atul's music and Shreya Ghoshal's voice create a touching experience.