'या' गोष्टींवरुन आलिया भटचे सासूसोबत होतात वाद, नीतू कपूर यांनी केला खुलासा; म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 17:05 IST2026-05-08T17:05:30+5:302026-05-08T17:05:59+5:30
प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर म्हणजेच अभिनेता रणबीर कपूरची आई आणि अभिनेत्री आलिया भट हिची सासू.

'या' गोष्टींवरुन आलिया भटचे सासूसोबत होतात वाद, नीतू कपूर यांनी केला खुलासा; म्हणाल्या...
प्रसिद्ध अभिनेत्री नीतू कपूर म्हणजेच अभिनेता रणबीर कपूरची आई आणि अभिनेत्री आलिया भट हिची सासू. वयाच्या ६४ व्या वर्षीही त्यांचे सौंदर्य एखाद्या तरुणीला लाजवेल असे आहे. सध्या नीतू कपूर त्यांच्या 'दादी की शादी' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट आज ८ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं नीतू कपूर विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकतंच एका मुलाखतीमध्ये त्यांनी घरातील खासगी गोष्टींवर भाष्य केलं. विशेषतः सून आलिया ही नात राहाला कशा प्रकारे सांभाळते आहे आणि त्यावरून सासू-सुनेत कसे गमतीशीर खटके उडतात, याबद्दल त्यांनी खुलासा केला.
सोहा अली खानने घेतलेल्या एका विशेष मुलाखतीत नीतू कपूर म्हणाल्या की, राहा ही आलियाचे खूप ऐकते आणि तिला घाबरतेही. याचे कारण म्हणजे आलिया शिस्तीच्या बाबतीत अतिशय कडक आहे. राहाच्या संगोपनात आलियाने टीव्ही आणि इतर अनावश्यक गोष्टींना पूर्णपणे फाटा दिला आहे. आलिया कडक शिस्तीची असली, तरी रणबीर कपूर मात्र राहासाठी एका मित्रासारखा आहे. तो तिच्यासोबत फक्त मज्जा-मस्ती करतो, असे त्यांनी नमूद केले.
राहाचे लाड करण्यावरून नीतू कपूर आणि आलियामध्ये वारंवार गमतीशीर वाद होतात. नीतू कपूर यांनी एक किस्सा सांगितला, त्या म्हणाल्या, "मी आलियाला नेहमी म्हणते की, 'आलिया, निदान मला तिला एक तरी चॉकलेट देऊ दे' पण आलिया ठामपणे सांगते, 'नाही, साखर तिच्या आरोग्यासाठी चांगली नाही'. त्यावर मी तिला हसून म्हणते, 'असू दे गं, मी आजी आहे, मला तिचे लाड करू दे".
आजच्या पालकांबद्दल आदर
नीतू कपूर यांनी आलियाच्या पालकत्वाच्या पद्धतीचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, "आजचे पालक खूप जागरूक आहेत. माझ्या काळात मला जे सर्वोत्तम वाटले ते मी केले, पण आजच्या पिढीला त्यांना नक्की काय हवे आहे, हे नीट ठाऊक आहे. मला त्यांच्या कामात हस्तक्षेप करायचा नाही, मला फक्त एक 'लाडकी आजी' बनायचे आहे".