जेवताना तुम्हीही कच्चा कांदा तोंडी लावता? बघा पचनावर कसा परिणाम होतो, ही सवय असेल तर....

Updated:May 8, 2026 17:02 IST2026-05-08T16:50:41+5:302026-05-08T17:02:08+5:30

जेवताना तुम्हीही कच्चा कांदा तोंडी लावता? बघा पचनावर कसा परिणाम होतो, ही सवय असेल तर....

जेव्हा घरी एखादी झणझणीत भाजी केली जाते किंवा डाळ बट्टी, पिठल्यासारख्या खमंग पदार्थांचा बेत असतो तेव्हा आपोआपच तोंडी लावायला कच्चा कांदा घेतला जातो.

जेवताना तुम्हीही कच्चा कांदा तोंडी लावता? बघा पचनावर कसा परिणाम होतो, ही सवय असेल तर....

रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यावरही आपण आवर्जून कच्चा कांदा तोंडी लावायला मागून घेतो. कारण त्यामुळे जेवणाची चव आणखी खुलते. जेवणाला रंगत येते आणि साधी भाजी, आमटीही खमंग लागू लागते. सध्या तर उन्हाळ्याचे दिवस असल्याने कित्येक जण कच्चा कांदा रोजच तोंडी लावायला घेतात. पण यामुळे आपल्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो हे तुम्हाला माहिती आहे का

जेवताना तुम्हीही कच्चा कांदा तोंडी लावता? बघा पचनावर कसा परिणाम होतो, ही सवय असेल तर....

एक्सपर्ट असं सांगतात की जर तुम्ही जेवणात कच्चा कांदा घेतला तर त्यामुळे शरीरात पाचक रस चांगल्या प्रमाणात तयार होतात. त्यामुळे आपण जे काही खातो ते खूप चांगल्या प्रकारे पचतं..

जेवताना तुम्हीही कच्चा कांदा तोंडी लावता? बघा पचनावर कसा परिणाम होतो, ही सवय असेल तर....

कच्च्या कांद्यामध्ये फायबर चांगल्या प्रमाणात असतात. हे फायबर अन्नामधले पौष्टिक घटक रक्तात अधिक चांगल्याप्रकारे शोषून घेण्यास मदत करतात.

जेवताना तुम्हीही कच्चा कांदा तोंडी लावता? बघा पचनावर कसा परिणाम होतो, ही सवय असेल तर....

जेवणात जर नियमितपणे कच्चा कांदा घेतला तर त्यामुळे रक्ताभिसरणही अधिक चांगलं होतं.

जेवताना तुम्हीही कच्चा कांदा तोंडी लावता? बघा पचनावर कसा परिणाम होतो, ही सवय असेल तर....

पचनासाठी आवश्यक असणारे जे चांगले बॅक्टेरिया असतात त्यांच्या पोषणासाठीही कांद्यातील काही घटक मदत करतात. त्यामुळे अन्नपचन जास्त चांगलं होतं.

जेवताना तुम्हीही कच्चा कांदा तोंडी लावता? बघा पचनावर कसा परिणाम होतो, ही सवय असेल तर....

पण जर तुम्हाला ॲसिडीटीचा त्रास असेल किंवा रक्त पातळ होण्याची औषधी तुम्ही घेत असाल तर मात्र डाॅक्टरांचा सल्ला घेऊनच कांदा तोंडी लावावा.शिवाय रात्रीच्या वेळीही कच्चा कांदा खाणे टाळायला हवे.