फरशी पुसण्याच्या कापडाला कुबट वास येतो? 'या' पद्धतीने धुवा- दुर्गंधी जाऊन कपडा स्वच्छ निघेल
Updated:May 9, 2026 10:31 IST2026-05-09T10:25:10+5:302026-05-09T10:31:27+5:30

फरशी पुसण्याचा कपडा नेहमीच स्वच्छ धुतला तरच तो स्वच्छ राहातो आणि त्याने आपल्या घरातल्या फरशा चांगल्या पुसल्या जातात.
या कपड्याकडे दुर्लक्ष केलं तर मग मात्र त्याला कुबट वास येतो. फरशी पुसताना आपल्या घरातही तो वास पसरतो आणि मग स्वच्छ पुसलेलं घरही घाण वाटू लागतं.
हे टाळायचं असेल आणि फरशी पुसण्याच्या कपड्यातली दुर्गंधी, घाण काढून टाकायची असेल तर आठवड्यातून दोन वेळा तरी तो पुढे सांगितलेल्या पद्धतीने धुवा.
एका बादलीमध्ये गरम पाणी घ्या. त्यामध्ये बेकिंग सोडा आणि डिशवॉश लिक्विड घाला. या पाण्यात कपडा अर्धा तास भिजवून ठेवा आणि नंतर तो धुवा. कपड्यातली दुर्गंधी खूप कमी होईल.
व्हिनेगर आणि शाम्पू २: १ या प्रमाणात घ्या. त्यामध्ये २ ते अडीच लीटर गरम पाणी घाला. आता या पाण्यात कपडा भिजवून ठेवा आणि नंतर घासून धुवून घ्या. कपडा अगदी स्वच्छ होईल.
याशिवाय रोजच्या रोज नेहमीचे कपडे धुण्याचे साबण वापरून फरशी पुसण्याच्या कपड्याची स्वच्छता होणं गरजेचं आहे.