बाबो! अभिनेत्रीचं प्रेग्नंसी फोटोशूट पाहून सगळेच चकित, नवऱ्यासोबत दिली अशी पोज; झालं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 11:04 IST2026-05-09T10:55:21+5:302026-05-09T11:04:55+5:30
या कपलला ओळखलंत का?

प्रेग्नंसी फोटोशूटचा ट्रेंड हा हल्लीचाच आहे. आजवर सोशल मीडियावर कितीतरी पद्धतीने केलेले हे फोटोशूट व्हायरल झाले आहेत

गेल्या काही वर्षात अनेक सेलिब्रिटींनी गुडन्यूज दिली आहे. अभिनेत्रींचं मॅटर्निटी फोटोशूट नेहमीच चर्चेत आलं. प्रत्येक जण काहीतरी हटके करत असतो.

कोणी पारंपरिक पद्धतीने तर कोणी अगदीच रिव्हीलिंग पद्धतीने हे शूट करतं. अर्थात सगळ्यांच्याच शूटमध्ये वेगळी सुंदरता असते.

हिंदी मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री आशका गोराडियाने नुकताच दुसऱ्या बाळाला जन्म दिला. त्याआधी तिचं मॅटर्निटी फोटोशूट व्हायरल झालं होतं.

आशकाचा नवरा ब्रेंट गॉबल हा योग प्रॅक्टिशनर आणि प्रशिक्षक आहे. दोघांनी समुद्रकिनारी योगाच्या एका आसनामध्ये हे फोटोशूट केलं आहे

आशकाने कॅप्शन देत लिहिलेले,'असे काही क्षण जे मी कधीच बदलणार नाही - वेळ कोणतीही असो किंवा मी कोणत्याही परिस्थितीत असो'

ब्रेंटने आशकाचं संपूर्ण वजन त्याच्या दोन पायांवर पेललं आहे. तर आशका प्रेग्नंसीच्या अवस्थेतही त्याच्या पायांवर ताठ बसून आसन करत आहे. यात तिचं बेबी बंप स्पष्ट दिसत आहे.

पहिल्या बाळाच्या जन्माआधीचंही आशकाचं प्रेग्नंसी शूट खूप व्हायरल झालं होतं. त्यांनी जंगलात अगदी बोल्ड स्वरुपात ते फोटोशूट केलं होतं.

















