होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 09:54 IST2026-05-09T09:51:54+5:302026-05-09T09:54:27+5:30

१० गंभीर जखमी, ५ जण बेपत्ता

US-Iran clash in the Strait of Hormuz! Firing breaks ceasefire | होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग

होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग

तेहरान/वॉशिंग्टन  : होर्मुझ सामुद्रधुनी परिसरात अमेरिका व इराण यांच्यातील तणाव पुन्हा उफाळून आला असून, युद्धविराम असतानाही दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ल्यांचे आरोप केले.

अमेरिकेच्या रात्रीच्या कारवाईत इराणचे एक मालवाहू जहाज लक्ष्य झाल्याचा दावा इराणने केला आहे. या हल्ल्यात जहाजाला आग लागून १० खलाशी जखमी झाले, तर पाच जण बेपत्ता असल्याची माहिती इराणच्या अधिकाऱ्यांनी दिली. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने याला 'आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन' असे म्हटले आहे तर अमेरिकेने स्वसंरक्षणार्थ कारवाई केली असल्याचे म्हटले आहे.

होर्मुझच्या कोंडीमुळे कच्च्या तेलाचे दर २०० डॉलरवर जाण्याचा धोका! सामुद्रधुनी बंदच राहिल्यास जागतिक अर्थव्यवस्थेलाही बसणार मोठा तडाखा

होर्मुझच्या कोंडीमुळे कच्च्या तेलाचे दर २०० डॉलरवर जाण्याचा धोका! सामुद्रधुनी बंदच राहिल्यास जागतिक अर्थव्यवस्थेलाही बसणार मोठा तडाखा

इराणचा यूएईवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला

दुबई : होर्मुझच्या सामुद्रध्रुनीमध्ये इराणने अमेरिकेच्या तीन युद्धनौकांवर केलेले हल्ले उधळून लावल्यानंतर, संयुक्त अरब अमिरातीवर (यूएई) ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. यूएईने या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

ट्रम्प यांचा 'लव्ह टॅप' आणि इशारा

ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या गोळीबारावर 'केवळ एक लव्ह टॅप' असे संबोधले आहे. युद्धविराम अद्याप लागू असून लवकरच करार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, करारावर स्वाक्षरी झाली नाही, तर इराणला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला.

ट्रम्प यांना कोर्टाचा पुन्हा दणका; १०% टॅरिफ रद्द

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'व्यापार युद्धा'ला अमेरिकी न्यायसंस्थेने लगाम घातला असून जगभरातून अमेरिकेत येणाऱ्या उत्पादनांवर ट्रम्प यांनी लादलेले १० टक्के जागतिक आयात शुल्क (ग्लोबल टॅरिफ) 'कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड'ने अवैध ठरवले आहे. राष्ट्राध्यक्षांनी लादलेले हे शुल्क कायद्याला धरून नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने ते रद्द केले आहे.

Web Title : होर्मुज जलडमरूमध्य में अमेरिका-ईरान भिड़े: युद्धविराम टूटा, जहाज में आग

Web Summary : होर्मुज जलडमरूमध्य में अमेरिका और ईरान के बीच तनाव बढ़ गया। ईरान ने अमेरिका पर एक मालवाहक जहाज पर हमला करने का आरोप लगाया, जिसमें चालक दल घायल हो गया। अमेरिका ने आत्मरक्षा का दावा किया। जवाबी हमलों में यूएई पर हमले शामिल थे। ट्रंप ने संघर्ष को 'लव टैप' बताया, और बिना समझौते के परिणाम की चेतावनी दी।

Web Title : US-Iran Clash in Hormuz Strait: Ceasefire Broken, Ship Ablaze

Web Summary : Tensions flared between the US and Iran in the Hormuz Strait. Iran accuses the US of attacking a cargo ship, injuring crew. The US claims self-defense. Retaliatory attacks included strikes on UAE. Trump downplayed the conflict as a 'love tap,' warning of consequences without a deal.