लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 09:27 IST2026-05-09T09:26:34+5:302026-05-09T09:27:40+5:30
Indian Army News: केंद्र सरकारने लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी (निवृत्त) यांची देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. ते विद्यमान सीडीएस अनिल चौहान यांची जागा घेतील.

लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द
केंद्र सरकारने लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी (निवृत्त) यांची देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. ते विद्यमान सीडीएस अनिल चौहान यांची जागा घेतील. अनिल चौहान यांचा कार्यकाळ ३० मे २०२६ रोजी संपणार आहे. तर सुब्रमणी हे ३१ मे रोजी पदभार स्वीकारतील. तसेच लेफ्टिनेंट जनरल सुब्रमणी हे लष्करी विषयांच्या विभागाचे सचिव म्हणून काम करतील.
लेफ्टिनेंट जनरल राजा सुब्रमणी यांची लष्करी कारकीर्द दैदिप्यमान अशी आहे. ते सध्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयामध्ये लष्करी सल्लागार म्हणून काम करत आहेत. तत्पूर्वी त्यांनी लष्कराचे उपप्रमुख आणि सेंट्रल कमांडचे जीओसी-इन-सी सारख्या महत्त्वपूर्ण पदांवर काम केले आहे. आता सुब्रमणी यांची नियुक्ती ही थिएटर कमांड आणि सशस्त्र दलांच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेला पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
लेफ्टिनेंट जनरल राजा सुब्रमणी नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी, जॉईंट सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ कॉलेज (यूके) आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज (नवी दिल्ली) चे माजी विद्यार्थी आहे. त्यांनी किंग्स कॉलेज लंडनमधून मास्टर डिग्री मिळवली होती. पुढे १९८६ च्या डिसेंबर महिन्यात एन. एस. राजा सुब्रमणी यांनी गढवाल रायफल्समध्ये कमिशन मिळाले होते.
यादरम्यान, व्हाईस अॅडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांना भारतीय नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून निश्चित करण्यात आले आहे. ते ३१ मे २०२६ रोजी पदभार स्वीकारतील. तसेच त्यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२८ पर्यंत असेल.