Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 11:35 IST2026-05-09T11:34:37+5:302026-05-09T11:35:08+5:30

नाशिक टीसीएस प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. एआयएमआयएम नेत्याच्या मदतीने ती हैदराबादला पळण्याच्या तयारीत होती.

Nashik TCS Case: How did Nida Khan's plan to escape to Hyderabad fail? AIMIM leader's mobile phone found and... | Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...

Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...

महाराष्ट्रभर खळबळ उडवून देणाऱ्या नाशिकमधील टीसीएस महिला कर्मचारी छळ आणि सक्तीचे धर्मांतरण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानला नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अत्यंत गोपनीयरीत्या सापळा रचून अटक केली. विशेष म्हणजे, या गुन्ह्यात तिला मदत केल्याच्या आरोपावरून एआयएमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.

'अशी' अडकली पोलिसांच्या जाळ्यात 

निदा खान आपल्या कुटुंबीयांसह छत्रपती संभाजीनगरमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट-१ ने स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिथे पाळत ठेवली. महिला पोलिसांच्या पथकाने सलग सहा दिवस साध्या वेशात निदा खानच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. जर पोलिसांनी कारवाई करण्यास थोडाही उशीर केला असता, तर ती थेट हैदराबादला पळून जाण्याच्या तयारीत होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

एआयएमआयएम नेत्याचे कनेक्शन काय?

निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी नगरसेवक मतीन पटेल यांचे नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी त्यांचा मोबाईल जप्त करून कॉल डिटेल्सची तपासणी सुरू केली आहे. निदा खान आणि मतीन पटेल यांच्यात काही आर्थिक व्यवहार झाले होते का? किंवा तिला लपवण्यासाठी एमआयएमच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला होता का? याचा तपास आता विशेष तपास पथक करत आहे.

काय आहे हे संपूर्ण प्रकरण?

नाशिकमधील टीसीएस कंपनीत काम करणाऱ्या अनेक महिला कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप केले होते. यामध्ये महिलांचे लैंगिक शोषण, बळजबरीने धर्मांतरणासाठी दबाव टाकणे, धार्मिक भावना दुखावणे आणि मानसिक छळ करणे अशा धक्कादायक तक्रारींचा समावेश होता. याप्रकरणी आतापर्यंत तब्बल ९ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता राज्य सरकारने एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. निदा खानच्या अटकेमुळे आता या रॅकेटमधील आणखी किती मोठे मासे गळाला लागतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आरोपी निदा खानची कसून चौकशी सुरू असून लवकरच मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title : नाशिक टीसीएस मामला: निदा खान की हैदराबाद भागने की योजना विफल; एआईएमआईएम नेता शामिल?

Web Summary : नाशिक टीसीएस उत्पीड़न मामले की मुख्य आरोपी निदा खान संभाजीनगर में गिरफ्तार। हैदराबाद भागने की योजना विफल। एआईएमआईएम पार्षद मतीन पटेल पर मदद करने का आरोप; पुलिस ने फोन जब्त किया। एसआईटी जांच जारी।

Web Title : Nashik TCS Case: Nida Khan's Hyderabad Escape Foiled; AIMIM Leader Involved?

Web Summary : Nida Khan, prime suspect in the Nashik TCS coercion case, arrested in Sambhajinagar. A planned Hyderabad escape failed. AIMIM corporator Matin Patel faces charges for aiding her; police seized his phone. SIT investigation underway.