युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण

Yuzvendra Chahal Arshdeep Singh BCCI IPL 2026: युजवेंद्र चहल विमानात स्मोकिंग करताना कॅमेऱ्यात कैद झाल्याने उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 11:34 IST2026-05-09T11:31:10+5:302026-05-09T11:34:52+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Yuzvendra Chahal caught smoking e-cigarette vaping but action be taken against Arshdeep Singh Know the case | युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण

युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण

Yuzvendra Chahal Vape Smoking Video Arshdeep Singh Vlogging BCCI IPL 2026: भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल विविध कारणांमुळे चर्चेत असतो. गेल्या वर्षी त्याचा धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाला. त्यानंतर त्याचे नाव आरजे महावेश सोबत जोडले गेले. त्यानंतर शेफाली बग्गासोबत युझी स्पॉट झाला होता. या साऱ्या गोंधळानंतर त्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करण्यास सुरूवात केली. पण काही दिवसांपूर्वी तो विमानात ई-सिगारेट ओढताना दिसला. यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या प्रकरणी अर्शदीप सिंगवर कारवाई होणार असल्याची शक्यता आहे. त्याचा या प्रकरणाशी संबंध काय, चहल-अर्शदीपवर काय कारवाई होणार? जाणून घेऊया.

अर्शदीप सिंगवर कारवाई का?

अर्शदीपवर ई-सिगारेटप्रकरणी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युझवेंद्र चहल हा विमानात प्रवास करताना अर्शदीपसिंगच्या कॅमेऱ्यात वेपिंग करताना कैद झाला. याप्रकरणी अर्शदीप सिंगवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने अर्शदीपला पुढे आदेशापर्यंत व्हिडीओ ब्लॉगिंग करण्यास बंदी घातली आहे. बीसीसीआय सचिव देवजित सैकिया यांनी निर्देशात म्हटले आहे की, ड्रेसिंग रूम आणि मैदानातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये वेपिंगच्या घटना बीसीसीआयच्या निदर्शनास आल्या आहेत. भारतीय कायद्यानुसार ई-सिगारेट आणि वेपचा वापर करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. जे कोणी या नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर बीसीसीआयच्या नियमांनुसार आणि कायदेशीर चौकटीत कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये कडक शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे.'

रियान परागकडूनही झालेली चूक, आता युजवेंद्र चहलवर काय कारवाई?

राजस्थानचा कर्णधार रियान पराग इ-सिगारेट स्मोकिंगमुळे वादात सापडला होता. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने कारवाई केली होती. पंजाब किंग्सविरुद्ध न्यू मुल्लापूर येथे झालेल्या लढतीदरम्यान रियान पराग स्मोकिंग करतानाचे दृश्य कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाले होते. रियान परागला पंजाब किंग्सविरुद्ध आयपीएलच्या आचारसंहितेच्या स्तर १ चे उल्लंघन केल्याबद्दल सामना शुल्काच्या २५% दंड ठोठावण्यात आला आणि एक डिमेरिट पॉइंट जमा करण्यात आला. आता तशाच प्रकारची कारवाई युजवेंद्र चहलवर होणार की आणखी काही, याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

Web Title : चहल का ई-सिगरेट सेवन: क्या अर्शदीप पर होगी कार्रवाई?

Web Summary : युजवेंद्र चहल को ई-सिगरेट पीते पकड़ा गया, जिससे चिंता बढ़ गई है। अर्शदीप सिंह, जिन्होंने इसे फिल्माया, प्रतिबंधित क्षेत्रों में वेपिंग के खिलाफ बीसीसीआई के नियमों का उल्लंघन करने के लिए परिणाम भुगत सकते हैं। पहले रियान पराग पर भी इसी तरह की कार्रवाई की गई थी।

Web Title : Chahal's E-cigarette Use: Will Arshdeep Face Action?

Web Summary : Yuzvendra Chahal was caught vaping on camera, raising concerns. Arshdeep Singh, who filmed it, may face consequences for violating BCCI rules against vaping in restricted areas. Similar action was taken against Riyan Parag previously.