उन्हाळ्यासाठी स्पेशल कॉटनचे बांधणीचे ड्रेस; १२ कलर कॉम्बिनेशन्स, साध्या ड्रेसमध्ये दिसा स्टायलिश
Updated:May 10, 2026 13:16 IST2026-05-10T12:55:55+5:302026-05-10T13:16:08+5:30
Cotton Bandhani Dresses For Ladies (Bandhani Dresses Design) : बांधणीची कला ही मूळची पांरपारीक असली तरी सध्याच्या काळात कुर्ते, अनारकली आणि प्लाझो सेट्समध्ये नवनवीन ट्रेंडी डिझाईन्स पाहायला मिळतात

उन्हाळ्याच्या कडाक्यात आरामदायी आणि स्टायलिश राहण्यासाठी कॉटनचे बांधणी ड्रेसेस हा एक उत्तम पर्याय आहे. (Summer Special Cotton Bandhani Dresses)
हे अत्यंत मऊ, सुती कापड उन्हाळ्यात घाम शोषून घेते आणि त्वचेला गारवा जेते. त्यामुळे दिवसभर हे कपडे घातल्यावरही त्रास होत नाही. (Cotton Bandhani Dress Material For Women)
बांधणीमध्ये गडद आणि उठावदार रंगांचा वापर केला जातो. पिवळा, गुलाबी, हिरवा आणि मोरपंखी अशा रंगांचे कॉम्बिनेशन रोजच्या वापरासाठी फ्रेश लूक देते.
बांधणीची कला ही मूळची पांरपारीक असली तरी सध्याच्या काळात कुर्ते, अनारकली आणि प्लाझो सेट्समध्ये नवनवीन ट्रेंडी डिझाईन्स पाहायला मिळतात.
हे ड्रेसेस वजनाला खूपच हलके असतात. त्यामुळे कामावर जाताना किंवा प्रवासात वावरणं सोपं जातं.
सुती बांधणीचे ड्रेसेस धुवायला आणि टिकायला चांगले असतात. योग्य काळीज गेतल्यास रंग आणि चमक बराचवेळ टिकून राहते.
रोजच्या वापरासाठी हे ड्रेसेस खिशाला परवडणारे असतात आणि कोणत्याही वयोगटातील स्त्रियांना शोभून दिसतात.
साध्या कुर्त्यापासून ते डिझाईनर गळ्याच्या पॅटर्न्स यामध्ये प्रचंड विविधता उपलब्ध आहे. ज्यामुळे तुम्हाला रोज नवीन लूक मिळू शकतो.
उन्हाळ्यातील उकाड्यावर मात करण्यासाठी आणि फॅशनेबल दिसण्यासाठी मऊ कॉटनचे बांधणी ड्रेसेस ही एक मस्ट हॅव गोष्ट आहे.
या ड्रेसेसमध्ये तुम्हाला गडद शेड, सौम्य शेड असे बरेच पर्याय उपलब्ध होतील.
जर तुम्हाला पंजाबी ड्रेसचे साधे पॅटर्न आवडत नसेल तर तुम्ही बांधणीचे कापड घेऊन सुंदर वनपीस शिवू शकता.
या ड्रेस पीसपासून शॉर्ट कुर्ती, लॉन्ग कुर्ता, क्रॉप टॉप असे बरेच पॅटर्न्सचे ड्रेस तुम्हाला शिवता येतील जे कूल लूक देतील. (Image Credit- Social Media)