डोळ्यांत अश्रू, चेहऱ्यावर आनंद...; थलपती विजय यांचा शपथविधी, मात्र चर्चा त्रिशा कृष्णनची, लूकने वेधलं साऱ्याचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 11:31 IST2026-05-10T11:25:01+5:302026-05-10T11:31:22+5:30
थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यात पोहोचली त्रिशा कृष्णन, सिनेसृष्टीत रंगली चर्चा

डोळ्यांत अश्रू, चेहऱ्यावर आनंद...; थलपती विजय यांचा शपथविधी, मात्र चर्चा त्रिशा कृष्णनची, लूकने वेधलं साऱ्याचं लक्ष
Thalapathy vijay Oath Ceremony: दाक्षिणात्य अभिनेते थलपती विजय सध्या अनेक कारणांनी चर्चेचा विषय बनले आहेत. अभिनेता ते थेट मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास चाहत्यांना पाहायला मिळत आहे. द्रविड पक्षांचे दशकांहून अधिक काळचे वर्चस्व मोडून काढत थलापती विजय आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.अलिकडेच ४ मे रोजी लागलेल्या विधानसभा निकालात विजयच्या टीव्हीके पक्षाने १०७ जागांवर बहुमत मिळवलं. अभिनेते विजय यांचा शपथविधी सोहळा चेन्नईमधल्या नेहरू स्टेडियममध्ये पार पडत आहे. या शपथविधी सोहळ्यात आज त्यांचा शपथविधी सोहळा होता. त्यांचे संपूर्ण कुटुंब या सोहळ्याला उपस्थित होते. लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णन देखील शपथविधी सोहळ्यात हजर असल्याची पाहायला मिळाली. त्यामुळे त्रिशा कृष्णनविषयी चित्रपटसृष्टीत चर्चा रंगली आहे.
Tamil Nadu: Actor Trisha Krishnan at the Jawaharlal Nehru Stadium in Chennai, where TVK Chief C Joseph Vijay will take oath as the Chief Minister of Tamil Nadu, shortly. pic.twitter.com/VmvDUqIjIq
— ANI (@ANI) May 10, 2026
या शपथविधी सोहळ्यात सर्वांच्या नजरा अभिनेत्री त्रिशा कृष्णनवरच खिळल्या होत्या.चेन्नईतील आपल्या निवास्थानावरून निघताना त्रिशाने या ऐतिहासिक सोहळ्याबद्दल उत्सुकता व्यक्त केली होती. या सोहळ्यात त्रिशा तिच्या आईसोबत उपस्थित होती.त्रिशा कृष्णन विजयच्या शपथविधी सोहळ्याला सी ग्रीन रंगाची साडी नेसून उपस्थित राहिली. तिने केसांमध्ये गजरा घातला होता आणि हलकासा मेकअप केला होता. या पारंपरिक वेशात ती खूपच सुंदर दिसत होती.
त्रिशा कृष्णन आणि विजय थलपथी हे जवळचे मित्र आहेत.त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यामुळे, विजयच्या शपथविधी सोहळ्याला तिचे उपस्थित राहणे स्वाभाविक होते. या प्रसंगी तिच्या डोळ्यात अश्रू स्पष्ट आणि चेहऱ्यावर आनंद तिच्या स्पष्टपणे दिसत होता. आज सकाळी सुरु झालेल्या या शपथविधी सोहळ्याला राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेते देखील उपस्थित होते.
विजय यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे, पण आता ते मुख्यमंत्री म्हणून तमिळनाडू या राज्याचा कारभार पाहणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता मोठी जबाबदारी असेल.