खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 11:41 IST2026-05-10T11:40:36+5:302026-05-10T11:41:18+5:30

अशोक खरातकडून सगळी माहिती गोळा केल्यानंतर त्याला मारून टाकले जाईल असं आम्ही आधीपासून सांगतोय असा आरोप नाना पटोले यांनी केला.

Sensational claim by Congress Nana Patole, "4 ministers involved in the fake Kharat case, will send a letter to the Chief Minister soon" | खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"

खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"

मुंबई - नाशिकच्या भोंदू खरात प्रकरणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी खळबळजनक दावा केला आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी अशोक खरातला अटक केली आहे. या प्रकरणात समोर आलेल्या व्हिडिओमुळे राज्यात वादळी चर्चा झाली. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून सरकारने याचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली. हा तपास सुरू असतानाच पटोले यांनी राज्यातील ४ मंत्र्‍यांचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचा दावा केला आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, अशोक खरातकडून सगळी माहिती गोळा केल्यानंतर त्याला मारून टाकले जाईल असं आम्ही आधीपासून सांगतोय, विधानसभेतही आम्ही बोललो. या खरात प्रकरणात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ४ मंत्र्‍यांचा समावेश आहे. याबाबत पत्रसुद्धा आम्ही मुख्यमंत्र्‍यांना देणार आहोत. या चारही मंत्र्‍यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची आमची मागणी आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. त्यामुळे राजकीय गुंड असतील किंवा भोंदू बाबा असतील हे समोर येत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने हे सगळे घडतंय. राज्यात भीती नावाचा प्रकार संपला आहे त्यामुळे अशा घटना यापुढेही महाराष्ट्रात सुरू राहतील असा आरोप करत नाना पटोले यांनी विकास लवांडे यांच्यावरील शाईफेकीच्या घटनेवरून सरकारला धारेवर धरले.

दरम्यान, अशोक खरात प्रकरणात अडकलेले ४ मंत्री कोण अशी चर्चा नाना पटोले यांच्या दाव्यानंतर सुरू झाली आहे. नाशिकच्या खरात याने स्वत:कडे दैवी शक्ती असल्याचं सांगत अनेक महिलांवर अत्याचार केले. याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर राज्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. काही महिलांनी पुढे येत खरातचे काळे कारनामे जगासमोर आणले. त्यानंतर खरात प्रकरणात अनेक व्यावसायिकही त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचं सांगत पुढे आले. विशेष म्हणजे राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष राहिलेल्या रुपाली चाकणकर यांचेही नाव यात जोडले गेले. विरोधकांच्या दबावानंतर चाकणकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. 

Web Title : सनसनीखेज दावा: खरात मामले में चार मंत्री शामिल, जल्द पत्र।

Web Summary : कांग्रेस नेता नाना पटोले ने दावा किया कि अशोक खरात मामले में चार मंत्री शामिल हैं, जहाँ एक स्वयंभू धर्मगुरु पर महिलाओं का यौन उत्पीड़न करने का आरोप है। पटोले ने महाराष्ट्र में कानून और व्यवस्था के टूटने का हवाला देते हुए मुख्यमंत्री को पत्र भेजकर उन्हें हटाने की मांग करने की योजना बनाई है।

Web Title : Sensational claim: Four ministers involved in Kharaat case, letter soon.

Web Summary : Congress leader Nana Patole claims four ministers are involved in the Ashok Kharaat case, where a self-proclaimed godman is accused of sexually assaulting women. Patole plans to send a letter to the CM demanding their removal, citing a breakdown of law and order in Maharashtra.