‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 11:02 IST2026-05-10T10:45:07+5:302026-05-10T11:02:55+5:30
Thalapathy Vijay CM Oath Ceremony: तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या विजयानंतर आज चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या विजयानंतर आज चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये तामिळनाडूचेमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विजय यांच्या पक्षाचे हजारो कार्यकर्ते, चाहते उपस्थित होते. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हेही या शपथविधी सोहळ्याला आवर्जुन उपस्थित राहिले.
#WATCH | Chennai: Tamilaga Vettri Kazhagam (TVK) Chief C Joseph Vijay takes oath as the Chief Minister of Tamil Nadu. pic.twitter.com/8yGuYEAkfj
— ANI (@ANI) May 10, 2026
विजय यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी १० मे रोजी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र नंतर ही वेळ बदलून १० वाजताची करण्यात आली. या नियोजित वेळेनुसार विजय यांनी जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विजय यांच्यासोबत इतर ९ जणांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
विजय यांच्यासोबत कुणी कुणी घेतली शपथ
आज झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्यासोबतच थिरू एन. आनंद, आधव अर्जुन, अरुण राज, के. ए. सेंगोटैय्यन, पी. वेंकेटरामनन, आर. निर्मलकुमार, राजमोहन, डॉ. टी. के. प्रभू आणि एन. कीर्तना यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
TVK leaders N. Anand, Aadhav Arjuna, Dr KG Arunraj, and KA Sengottaiyan take oath as Ministers for the state of Tamil Nadu.
— ANI (@ANI) May 10, 2026
TVK Chief C. Joseph Vijay took the oath as the Chief Minister of Tamil Nadu. pic.twitter.com/UMJGLQRYA2