लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 10:09 IST2026-05-10T10:08:28+5:302026-05-10T10:09:05+5:30

बिहारच्या गोपालगंजमध्ये लग्नाच्या वाढदिवशीच एका ३ महिन्यांच्या गरोदर महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे.

gopalganj pregnant woman killed on first marriage anniversary for dowry | लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव

फोटो - आजतक

बिहारच्या गोपालगंजमध्ये लग्नाच्या वाढदिवशीच एका ३ महिन्यांच्या गरोदर महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. ही घटना सिधवलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बखरौर गावात घडली आहे. गुड़िया देवी (२२ वर्षे) असं महिलेचं नाव असून ती मनीष कुंवरची पत्नी होती. घटनेनंतर सासरचे लोक मृतदेह घरातच सोडून फरार झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला असून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुड़ियाचा लग्न ८ मे २०२५ रोजी सिधवलिया पोलीस ठाणे परिसरातील बखरौर गावातील रहिवासी मनीष कुंवर याच्याशी झालं होतं. लग्नाच्या वेळी मुलीच्या वडिलांनी आपल्या ऐपतीप्रमाणे हुंडा आणि भेटवस्तू दिल्या होत्या. गुड़िया ३ महिन्यांची गरोदर असताना सासरच्या मंडळींनी हुंड्यात 'बुलेट' आणि सोन्याच्या चेनची मागणी सुरू केली. ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे गुड़ियाचा छळ सुरू झाला आणि शुक्रवारी रात्री उशिरा तिची हत्या करण्यात आली.

सासरची सर्व मंडळी फरार

घटनेची माहिती मिळताच सिधवलिया पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलीस पोहोचण्यापूर्वीच पतीसह सासरच्या सर्व सदस्यांनी घरातून पळ काढला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार की, "सिधवलिया पोलीस ठाण्यांतर्गत बखरौर गावात एका महिलेचं लग्न साधारण एक वर्षापूर्वी झालं होतं, पोलिसांनी एफएसएल (FSL) टीमच्या मदतीने संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे." या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. 

Web Title : शादी की सालगिरह पर गर्भवती महिला की हत्या; दहेज में 'बुलेट' की मांग बनी वजह

Web Summary : बिहार: शादी की सालगिरह पर दहेज की मांग के चलते गर्भवती महिला की हत्या। पति और ससुराल वाले फरार। पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Pregnant Woman Murdered on Anniversary; Dowry 'Bullet' Demand Cited

Web Summary : Bihar: Pregnant woman killed on anniversary over dowry demands. Husband and in-laws fled. Police investigating the dowry death.