नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 09:57 IST2026-05-10T09:56:53+5:302026-05-10T09:57:28+5:30

या मंत्रिमंडळात अनुभवासोबतच युवा आणि आधुनिक राजकारणाचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केला आहे.

Tamilnadu Oath Ceremony: Digital warriors, doctors and young faces; Who has a chance in Team Vijay's cabinet? | नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?

नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?

चेन्नई - तामिळनाडूच्या राजकारणात ७० वर्षांनी ऐतिहासिक बदल घडला आहे. द्रविड पक्षांचे दशकांहून अधिक काळचे वर्चस्व मोडून काढत थलापती विजय आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. विजय यांचा टीव्हीके पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून तामिळनाडूच्या राजकारणात उदयास आला. विजय यांना बहुमत मिळवता आले नाही पण सहा दिवसांच्या राजकीय हालचालींनंतर विजय यांच्या टीव्हीके पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला आहे.

तामिळनाडूत आज विजय यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल. या सोहळ्यात विजय मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतील त्याशिवाय इतर ९ आमदार मंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. या मंत्रिमंडळात अनुभवासोबतच युवा आणि आधुनिक राजकारणाचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केला आहे. विजय यांनी त्यांच्या नव्या टीममध्ये अशा लोकांना संधी दिली आहे ज्यांनी जमिनीस्तरावर आणि डिजिटल वॉर रूममधून पक्षाला इतका मोठा विजय मिळवून दिला. टीव्हीकेच्या कॅबिनेट मंत्रि‍पदासाठी कुणाकुणाला संधी मिळाली हे जाणून घेऊया. 

एस किर्तना (सर्वात युवा मंत्री) - शिवकाशी मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार बनलेली २९ वर्षीय एस किर्तना टीम विजय यांच्या कॅबिनेटमधील सर्वात चर्चेतला चेहरा आहे. आपल्या प्रभावी संवाद शैली आणि हिंदीवरील पकड यामुळे त्यांनी सोशल मीडियात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आधव अर्जुन - टीव्हीकेचे महासचिव आणि विल्लीवक्कम मतदारसंघातील आमदार, माजी बास्केटबॉल खेळाडू आणि राजकारणातील रणनीतीकार असलेले अर्जुन यांनी चेन्नईसारख्या शहरी भागात पक्षाला मजबूत आधार दिला.

सी.टी.आर निर्मल कुमार - तिरुप्परनकुंद्रम जागेवर प्रचंड मताधिक्याने विजय मिळवलेले निर्मल कुमार हे पक्षाच्या 'डिजिटल शक्ती'चे शिल्पकार मानले जातात. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पारंपरिक राजकारणात मोठं आव्हान उभे केले.

के. जी. अरुणराज - माजी आयआरएस अधिकारी आणि डॉक्टर असलेले अरुणराज हे तिरुचेनगोडूचे आमदार आहेत. ते पक्षाच्या धोरणांचे आणि प्रचार मोहिमांचे मुख्य रणनीतिकार आहेत.

एन. आनंद - विजयचे सर्वात जुने आणि सर्वात विश्वासू सहकारी, ज्यांनी संघटना गावोगावी पसरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

के.ए. सेंगोट्टय्यान - तामिळनाडू वेत्री कळघम (TVK) चे मुख्य समन्वयक के.ए. सेंगोट्टय्यान यांनी गोबिचेट्टीपलायम विधानसभा मतदारसंघात १६ हजार ६२० मतांनी विजय मिळवला. त्यांनी एकूण ८२ हजार ६१२  मते मिळवून द्रमुकच्या एन. नल्लाशिवम यांचा पराभव केला, ज्यांना ६५ हजार ९९२ मते मिळालीत. 

पी. वेंकटरामनन - हे विजयच्या पक्षाचे खजिनदार आणि तामिळनाडूतील सैदापेट लॉ असोसिएशनमध्ये वकील आहेत. ते चेन्नई जिल्ह्यातील मायलापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाचे प्रतिनिधित्व करत तामिळनाडू विधानसभेचे सदस्य बनलेत. राजकारण आणि वकिली याशिवाय वेंकटरामनन यांनी २००० सालापासून अभिनेता विजयचे मॅनेजर म्हणूनही काम पाहिले आहे आणि ते त्यांच्या सर्वात विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक मानले जातात.

राजमोहन अरुमुगम -  चेन्नईतील एग्मोर (एससी) विधानसभा मतदारसंघ जिंकून विजयाचा एक विश्वासार्ह चेहरा म्हणून स्वतःला समोर केले. आपल्या प्रखर भूमिकेसाठी आणि सामाजिक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या राजमोहन अरुमुगम यांनी या निवडणुकीत पारंपरिक पक्षांतील दिग्गजांना पराभूत करून विधानसभेत आपले स्थान निर्माण केले आहे.

डॉ. टी. के. प्रभू - तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२६ मध्ये तामिळनाडू वेत्री कळघम (TVK) पक्षाचे उमेदवार डॉ. टी. के. प्रभू यांनी कराईकुडी विधानसभा मतदारसंघातून प्रचंड विजय मिळवला. व्यवसायाने डेन्टिस्ट असलेल्या डॉ. प्रभू यांनी विद्यमान काँग्रेस आमदार एस. मंगुडी यांचा ४६,०७४ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला.

Web Title : नया दौर: विजय का मंत्रिमंडल - युवा, डॉक्टर और डिजिटल योद्धा!

Web Summary : थलपति विजय तमिलनाडु के मुख्यमंत्री बने, द्रविड़ वर्चस्व समाप्त। उनके मंत्रिमंडल में अनुभव और युवाओं का मिश्रण है, जिन्होंने जमीनी स्तर से लेकर डिजिटल युद्ध कक्षों तक उनकी जीत को बढ़ावा दिया। एस कीर्तना, आधव अर्जुन और डिजिटल रणनीतिकार निर्मल कुमार जैसे प्रमुख मंत्री शामिल हैं।

Web Title : New Era: Vijay's Cabinet - Youth, Doctors, and Digital Warriors!

Web Summary : Thalapathy Vijay becomes Tamil Nadu's CM, ending Dravidian dominance. His cabinet blends experience with youth, rewarding those who fueled his victory from grassroots to digital war rooms. Key ministers include S Kirthana, Adhav Arjun, and digital strategist Nirmal Kumar.