मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 12:37 IST2026-05-10T12:28:46+5:302026-05-10T12:37:15+5:30

Thalapathy Vijay CM Oath Ceremony: विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास सुरुवात केल्यावर विजय यांचे वडील एस.ए. चंद्रशेखर  आणि आई शोभा चंद्रशेखर यांचं मन भरून आलं. या भावूक  क्षणी त्यांना आपले आनंदाश्रू रोखता आले नाहीत. हा प्रसंग कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. 

Thalapathy Vijay CM Oath Ceremony: Son becomes Chief Minister! Vijay's parents get emotional while clapping, tears of joy start flowing | मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू

मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू

अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या या शपथविधी सोहळ्याला विजय यांचे चाहते, टीव्हीकेचे हजारो समर्थक यांच्यासह विजय यांचे आई-वडीलही उपस्थित होते. दरम्यान, शपथविधीवेळी विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास सुरुवात केल्यावर विजय यांचे वडील एस.ए. चंद्रशेखर  आणि आई शोभा चंद्रशेखर यांचं मन भरून आलं. या भावूक  क्षणी त्यांना आपले आनंदाश्रू रोखता आले नाहीत. हा प्रसंग कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे.

विजय यांच्या जीवनात त्यांच्या आई-वडिलांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. दरम्यान, आज विजय यांच्या शपथविधीवेळी त्यांचे वडील एस.ए. चंद्रशेखर  आणि आई शोभा चंद्रशेखर हे समोरील प्रेक्षागारात बसले होते. तसेच शपथविधीवेळी त्यांना आपल्या यशस्वी मुलाच्या जीवनातील ऐतिहासिक क्षण पाहताना आपल्या भावना लपवता आल्या नाहीत. यादरम्यान, विजय यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर यांच्या डोळ्यातून नकळत आनंदाश्रू ओघळले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, आज झालेल्या शपथविधी सोहळ्यावेळी विजय यांच्यासोबत इतर ९ जणांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यावेळी थिरू एन. आनंद, आधव अर्जुन, अरुण राज, के. ए.  सेंगोटैय्यन, पी. वेंकेटरामनन, आर. निर्मलकुमार, राजमोहन, डॉ. टी. के. प्रभू आणि एन. कीर्तना  यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

Web Title : बेटा बना मुख्यमंत्री! विजय के माता-पिता हुए भावुक, खुशी के आंसू छलके।

Web Summary : अभिनेता जोसेफ विजय ने तमिलनाडु के मुख्यमंत्री पद की शपथ ली। माता-पिता एस.ए. चंद्रशेखर और शोभा चंद्रशेखर भावुक हो गए, शपथ ग्रहण समारोह के दौरान आंसू छलके। नौ अन्य लोगों ने मंत्री पद की शपथ ली।

Web Title : Son Becomes Chief Minister! Vijay's Parents Overwhelmed, Shed Tears of Joy.

Web Summary : Actor Joseph Vijay sworn in as Tamil Nadu CM. Parents S.A. Chandrasekhar and Shobha Chandrasekhar became emotional, tears flowed during the ceremony. Nine others took oath as ministers.