कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 12:30 IST2026-05-10T12:27:50+5:302026-05-10T12:30:01+5:30

मडगाव जंक्शन-पनवेल-मडगाव जंक्शन दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे चालवण्याची घोषणा केली आहे. पण गाडी कोणत्या स्थानकांवर थांबणार आहे?

Pleasant relief from railways for Konkan, Goa passengers; Weekly summer special train, know complete details | कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 

कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 

नवी मुंबई : उन्हाळी सुट्टयांमध्ये कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मडगाव जंक्शन-पनवेल-मडगाव जंक्शन दरम्यान अतिरिक्त साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे चालवण्याची घोषणा केली आहे.

मडगावहून १० मे रोजी सुटणार विशेष गाडी 

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०११०६ मडगाव जंक्शन-पनवेल रेल्वे स्थानक साप्ताहिक विशेष रेल्वे रविवार, १० मे २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजता मडगाव जंक्शन येथून रवाना होणार आहे. ती दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता पनवेल स्थानकात पोहोचेल.

पनवेलहून ११ मे रोजी परतीची सेवा 

त्यानंतर गाडी क्रमांक ०११०५ पनवेल-मडगाव जंक्शन विशेष रेल्वे सोमवार, ११ मे २०२६ रोजी सकाळी ५:४५ वाजता पनवेल येथून सुटणार असून, सायंकाळी ६:१० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचणार आहे.

कोकणातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा 

ही विशेष रेल्वे करमाळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडावली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेण या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा घेणार आहे. त्यामुळे गोवा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील प्रवाशांना या सेवेचा मोठा लाभ होईल.

२३ डब्यांची विशेष रचना 

या विशेष गाडीमध्ये एकूण २३ डबे आहेत. त्यामध्ये वातानुकूलित तृतीय श्रेणीचे ३ डबे, स्लीपरचे ११ डबे, सामान्य श्रेणीचे ७ डबे तसेच एसएलआरचे २ डबे असतील.

Web Title : कोंकण-गोवा यात्रियों को रेलवे राहत: साप्ताहिक ग्रीष्मकालीन विशेष ट्रेन घोषित।

Web Summary : मध्य रेलवे ने कोंकण और गोवा के यात्रियों की भीड़ को कम करने के लिए मडगांव और पनवेल के बीच 10 मई, 2026 से साप्ताहिक ग्रीष्मकालीन विशेष ट्रेन की घोषणा की। यह ट्रेन कोंकण क्षेत्र के प्रमुख स्टेशनों पर रुकेगी, जिससे गोवा, सिंधुदुर्ग और रत्नागिरी जिलों के यात्रियों को लाभ होगा। इसमें 23 कोच हैं।

Web Title : Konkan-Goa travelers get railway relief: Weekly summer special train announced.

Web Summary : Central Railway announces a weekly summer special train between Madgaon and Panvel, starting May 10, 2026, to ease passenger rush for Konkan and Goa. The train will halt at key stations in the Konkan region, benefiting travelers from Goa, Sindhudurg, and Ratnagiri districts. It comprises 23 coaches.