संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 13:37 IST2026-05-10T13:37:01+5:302026-05-10T13:37:57+5:30

४ मुलांची आई आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याने संतापलेल्या पतीने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

Mother of four flees with neighbor, leaving family behind! Desperate husband takes extreme step | संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल

AI Generated Image

उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. इथे एका चार मुलांच्या आईने संसाराचा विचार न करता आपल्या शेजारी राहणाऱ्या प्रियकरासोबत पळ काढला. पत्नीच्या या कृत्यामुळे आणि पोलिसांच्या कथित निष्काळजीपणामुळे हतबल झालेल्या पतीने चक्क स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, वेळेवर ग्रामस्थांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

काय आहे हे 'लव्ह ट्रँगल' प्रकरण?

हृदय पिळवटून टाकणारी ही घटना फतेहपूर जिल्ह्यातील खखरेरू पोलीस स्टेशन हद्दीतील पौली गावात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एका तरुणाच्या पत्नीचे तिच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांतून ही चार मुलांची आई आपल्या मुलांची आणि पतीची पर्वा न करता अचानक प्रियकरासोबत घर सोडून फरार झाली.

पतीने भररस्त्यात ओतलं पेट्रोल

पत्नी पळून गेल्याचे समजताच पतीच्या पायाखालची जमीन सरकली. तो गेल्या काही दिवसांपासून तिचा शोध घेत होता. मात्र, कुठेही पत्ता न लागल्याने आणि पोलीस दाद देत नसल्याच्या भावनेतून त्याने टोकाचे पाऊल उचलले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये हा तरुण भररस्त्यात स्वतःवर पेट्रोल ओतून घेताना दिसत आहे. तो मोठ्याने ओरडून आपली व्यथा मांडत होता. त्याचवेळी ग्रामस्थांनी धाडस दाखवून त्याच्या हातातील काडीपेटी हिसकावून घेतली आणि त्याचा जीव वाचवला.

पोलिसांवर गंभीर आरोप

पीडित पतीचा असा आरोप आहे की, त्याने याप्रकरणी स्थानिक पोलिसांकडे लेखी तक्रार दिली होती, परंतु पोलिसांनी त्याची तक्रार गांभीर्याने घेतली नाही. पोलिसांच्या या भूमिकेमुळे आणि पत्नीच्या जाण्याच्या दुःखात तो मानसिक तणावाखाली होता. आता त्याने पोलिसांना अल्टीमेटम दिला आहे की, जर त्याच्या पत्नीला लवकर शोधले नाही आणि आरोपी शेजाऱ्यावर कारवाई केली नाही, तर तो पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न करेल.

मुलांचा आक्रोश!

या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. पळून गेलेल्या महिलेला चार लहान मुले असून, आई सोडून गेल्यामुळे त्यांचा रडून रडून हाल झाला आहे. पोलीस सध्या फरार जोडीदाराचा शोध घेत असून लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

Web Title : चार बच्चों की माँ प्रेमी संग फरार, पुलिस की निष्क्रियता से पति ने की आत्महत्या की कोशिश

Web Summary : उत्तर प्रदेश में चार बच्चों की माँ एक पड़ोसी के साथ भाग गई, जिससे व्यथित पति ने कथित पुलिस लापरवाही के कारण आत्मदाह का प्रयास किया। ग्रामीणों ने हस्तक्षेप कर उसे बचा लिया। उसने पुलिस पर निष्क्रियता का आरोप लगाया और पत्नी न मिलने पर आगे कार्रवाई की धमकी दी।

Web Title : Mother of Four Elopes; Husband Attempts Suicide Over Police Inaction

Web Summary : In Uttar Pradesh, a mother of four eloped with a neighbor, prompting her distraught husband to attempt self-immolation due to alleged police negligence. Villagers intervened, saving him. He accuses police of inaction and threatens further action if his wife isn't found.