'मदर्स डे'ला क्रांती रेडकरला जुळ्या मुलींनी दिलं खास गिफ्ट, लेकींनी काढलेलं चित्र पाहून अभिनेत्रीने डोक्याला मारला हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 14:47 IST2026-05-11T14:46:36+5:302026-05-11T14:47:00+5:30

मदर्स डेच्या दिवशी अभिनेत्री क्रांती रेडकरला तिच्या जुळ्या लेकींकडून छान सरप्राइज मिळालं. क्रांतीच्या जुळ्या मुलींनी मदर्स डेला तिला खास गिफ्ट देत हा दिवस स्पेशल बनवला.

kranti redkar received special gift from daughters on mothers day shared video | 'मदर्स डे'ला क्रांती रेडकरला जुळ्या मुलींनी दिलं खास गिफ्ट, लेकींनी काढलेलं चित्र पाहून अभिनेत्रीने डोक्याला मारला हात

'मदर्स डे'ला क्रांती रेडकरला जुळ्या मुलींनी दिलं खास गिफ्ट, लेकींनी काढलेलं चित्र पाहून अभिनेत्रीने डोक्याला मारला हात

मदर्स डेच्या दिवशी अभिनेत्री क्रांती रेडकरला तिच्या जुळ्या लेकींकडून छान सरप्राइज मिळालं. क्रांतीच्या जुळ्या मुलींनी मदर्स डेला तिला खास गिफ्ट देत हा दिवस स्पेशल बनवला. याचा व्हिडीओ अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. लेकींनी मदर्स डेला दिलेलं गिफ्ट पाहून क्रांती रेडकर खूश तर झाली. मात्र त्यानंतर तिला डोक्यावर हात मारण्याची वेळ आली होती. 

क्रांती रेडकरने तिच्या इन्स्टाग्रामवरुन याचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दिसतंय की क्रांतीच्या दोन्ही लेकी छबील आणि गोदो मदर्स डे निमित्त त्यांनी स्वत: हाताने तयार केलेलं गिफ्ट अभिनेत्रीला देतात. यामध्ये एक ग्रिटिंग कार्ड आणि एक गेम गिफ्ट म्हणून क्रांतीला लेकींनी दिल्याचं दिसतं. नंतर क्रांती त्यातलं एक ग्रिटिंग कार्ड उघडते. त्यावर हार्ट काढलेलं असतं आणि आतमध्ये क्रांती म्हणून मुलीचं चित्र काढलेलं दिसत आहे. ते चित्र पाहून क्रांती म्हणते - "काय रे देवा...". आणखी एका ग्रिटिंग कार्डवर "आय लव्ह यू मॉम...तू सगळ्यात चांगली आई आहेस", असं लिहिलेलं दिसत आहे. 


क्रांतीच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. क्रांतीने २०१७ मध्ये समीर वानखेडेंशी लग्न करत संसार थाटला. लग्नानंतर एका वर्षाने क्रांतीने तिच्या जुळ्या लेकींना जन्म दिला. झिया आणि झायदा अशी तिच्या लेकींची नावं आहेत. क्रांती अनेकदा तिच्या लेकींसोबतचे फोटो आणि मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. 

Web Title : क्रांति रेडकर को मदर्स डे पर मिला सरप्राइज, बेटियां का उपहार देख हुईं हैरान।

Web Summary : क्रांति रेडकर को मदर्स डे पर उनकी जुड़वां बेटियों से हस्तनिर्मित उपहार मिले। अभिनेत्री कार्ड और एक गेम से खुश थी, लेकिन उनकी एक ड्राइंग ने उन्हें हैरानी से प्रतिक्रिया करने पर मजबूर कर दिया। प्रशंसकों ने वीडियो पर खूब प्यार बरसाया।

Web Title : Kranti Redkar's Mother's Day surprise: Twin daughters' gift leaves her stunned.

Web Summary : Kranti Redkar received handmade gifts from her twin daughters on Mother's Day. The actress was delighted by the cards and a game, but a drawing of her made her hilariously react with surprise. Fans showered love on the video.