अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 14:35 IST2026-05-11T14:34:44+5:302026-05-11T14:35:19+5:30

Jara Hatke News: बाहेर पाटी एटीएमची आणि आत सलून सुरू असल्याचा अजब प्रकार पाटणा येथील दानापूर येथे सुरू आहे. तसेच बाहेरू एटीएम  आणि आत हजामत हे दृश्य  पाहून लोकही अवाक्  होत  आहेत.

A salon is operating in SBI ATM, those who come to withdraw money are speechless, what exactly is it? | अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?

अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?

बाहेर पाटी एटीएमची आणि आत सलून सुरू असल्याचा अजब प्रकार पाटणा येथील दानापूर येथे सुरू आहे. तसेच बाहेरू एटीएम  आणि आत हजामत हे दृश्य  पाहून लोकही अवाक्  होत  आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार येथील एसबीआयच्या एका जुन्या एटीएममध्ये आता रोख रक्कम काढण्याचं नाही तर  केस कापण्याचं आणि दाढी करण्याचं काम चालतं. येथे बाहेर पूर्ण सेटअप हा एसबीआयच्या एटीएमचा आहे. मात्र आतमध्ये शिरताच लोकांना एटीएम नाही  तर  सलूनमधील मोठी खुर्ची, आरसे आणि हेअर ड्रायर दिसतात.

हे अजब सलून दानापूरमधील रूपसपूर परिसरातील  उषा व्हिला येथे आहे. स्थानिक लोक सांगतात  की, येथे अनेक वर्षांपर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम सुरू होतं. तसेच  आजूबाजूच्या परिसरातील  लोक रोख रक्कम काढण्यासाठी येथेच यायचे. मात्र काही महिन्यांपूर्वी हे एटीएम येथून  हटवण्यात आले. मात्र एटीएम हटवल्यानंतर त्याचा बोर्ड, बाहेरील डिझाईन आणि एकूण स्ट्रक्चर तसाच ठेवण्यात आला होता. पुढे काही दिवसांत ही जागा एका सलूनवाल्याला भाड्याने देण्यात आली. आता तिथे सलून सुरू आहे. मात्र बाहेरील रचनेमुळे अनोळखी लोकांची गफलत होते आणि ते पैसे काढण्यासाठी येतात.

स्थानिकांच्या मते  त्यांचाही सुरुवातीला गोंधळ उडायचा. एटीएममध्ये सलून कसं काय सुरू झालं,असा प्रश्न पडायचा. आता  ही जागा परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. 

Web Title : अजीब! एसबीआई एटीएम सैलून में बदला; पटना में ग्राहक हैरान।

Web Summary : पटना के दानापुर में एक पुराना एसबीआई एटीएम अब सैलून बन गया है। एटीएम का बाहरी हिस्सा वैसा ही है, लेकिन अंदर ग्राहकों को नकदी के बजाय नाई की कुर्सियाँ और दर्पण मिलते हैं। भ्रमित स्थानीय लोगों ने शुरू में इस सेटअप पर सवाल उठाया, जो अब एक स्थानीय चर्चा का विषय है।

Web Title : Bizarre! SBI ATM turned into salon; customers surprised in Patna.

Web Summary : An old SBI ATM in Patna's Danapur now houses a salon. The ATM's exterior remains, but inside, customers find barber chairs and mirrors instead of cash. Confused locals initially questioned the setup, which is now a local talking point.