'दृश्यम' इतकाच जबदरस्त सस्पेन्स! ८ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'या' सिनेमाने कमावलेले १०४ कोटी, मिळाले तीन राष्ट्रीय पुरस्कार; कुठे बघाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:58 IST2026-05-11T13:46:41+5:302026-05-11T13:58:58+5:30
८ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'या' सिनेमाने कमावलेले १०४ कोटी, मिळाले तीन राष्ट्रीय पुरस्कार; कुठे बघाल?

'दृश्यम' इतकाच जबदरस्त सस्पेन्स! ८ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'या' सिनेमाने कमावलेले १०४ कोटी, मिळाले तीन राष्ट्रीय पुरस्कार; कुठे बघाल?
Bollywood Cinema: भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात असे अनेक चित्रपट आले आहेत, ज्यांनी बॉक्स ऑफिसची समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली आहेत. एकेकाळी असं मानलं जायचं की एका चित्रपटाच्या यशासाठी मोठे बजेट, आकर्षक ठिकाणे आणि मोठे स्टार्स आवश्यक असतात, पण २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा या सगळ्याला अपवाद ठरला. फक्त ८ कोटी बजेट असलेल्या बहुचर्चित सिनेमाने त्याकाळी बॉक्स ऑफिसवर १०४ कोटी रुपये इकतं कलेक्शन केलं होतं. या सिनेमाची सध्या चर्चा आहे. तर कोणता आहे चित्रपट, कुठे बघाल... जाणून घ्या
दरम्यान, या चित्रपटाचं नाव म्हणजे 'कहाणी'. दिग्दर्शक सुजॉय घोष यांचा कहानी हा चित्रपट २०१२ साली रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होचता. उत्तम कथा, जबरदस्त दिग्दर्शन आणि खिळवून ठेवणारा क्लायमॅक्सने प्रेक्षकांची मनं जिंकली.IMDb वर ८.१ रेटिंग असलेला 'कहाणी'हा सिनेमा बॉलिवूडमधील सर्वौत्तम सस्पेन्स थ्रिलर्सपैकी एक ठरला. विशेष म्हणजे हा चित्रपट थिएटर्समध्ये ५० दिवस चालला होता.कहानी या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन, परमब्रता चॅटर्जी आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
कथानक
चित्रपटाचे कथानक दुर्गा पुजेच्या उत्सवादरम्यान कोलकाता येथे हरवलेला विद्या बागचीच्या नवऱ्याचा शोध घेताना सुरू होते. यामध्ये सत्योकी राणा हे पात्र विद्याला मदत करताना दिसते. विद्या बालन म्हणजेच विद्या बागची ही या दरम्यान गर्भवती असते. विद्या लंडनहून तिच्या नवऱ्याच्या शोधासाठी भारतात येते.जो एका कामासाठी भारतात आला आणि कधीच परतला नाही. दुर्गापूजेच्या उत्सवात मग्न असलेल्या कोलकाता शहराच्या मध्यभागी विद्याचा संघर्ष सुरू होतो.दरम्यान, विद्याची भेट पोलीस अधिकारी सत्योकी 'राणा' सिन्हा (परमब्रता चॅटर्जी) यांच्याशी होते, जे तिला या संपूर्ण प्रकरणात मदत करतात. या चित्रपटात सस्पेन्स इतका जबरदस्त आहे की तो याबाबतीत दृश्यमसारख्या सिनेमांना मागे टाकतो.
'कहानी' केवळ व्यावसायिकदृष्ट्या बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही, तर
चित्रपटाचं समीक्षकांकडूनही प्रचंड कौतुक झालं.कहानी चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी कहानी चित्रपटातील ‘एकला चालो रे’ हे बंगाली देशभक्तीपर गाणे गायले होते.जे आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. हा सिनेमा 'Amazone Prime' वर उपलब्ध आहे.