"मुलीने माझ्यासारखं होऊ नये..."; कियारा अडवाणीचं मोठं विधान, लेकीकडून आहेत 'या' अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 14:34 IST2026-05-11T14:33:00+5:302026-05-11T14:34:29+5:30

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत कियाराने आई झाल्यानंतरचा प्रवास, भावनिक आव्हानं आणि पती सिद्धार्थकडून मिळालेली साथ यावर भाष्य केले. याशिवाय ''मुलीने माझ्यासारखं बनू नये'', असं मोठं विधान कियाराने केलं आहे. काय म्हणाली?

my girl should not be like me Kiara Advani big statement about daughter Saraayah | "मुलीने माझ्यासारखं होऊ नये..."; कियारा अडवाणीचं मोठं विधान, लेकीकडून आहेत 'या' अपेक्षा

"मुलीने माझ्यासारखं होऊ नये..."; कियारा अडवाणीचं मोठं विधान, लेकीकडून आहेत 'या' अपेक्षा

अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे दोघे गेल्या वर्षी आई-बाबा झाले. त्यांनी मुलीचं नाव 'सारायाह' (Saraayah) असं ठेवलं. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत कियाराने आई झाल्यानंतरचा प्रवास, भावनिक आव्हानं आणि पती सिद्धार्थकडून मिळालेली साथ यावर भाष्य केले. याशिवाय ''मुलीने माझ्यासारखं बनू नये'', असं मोठं विधान कियाराने केलं आहे. काय म्हणाली?

कियारा अडवाणीने मुलाखतीदरम्यान सांगितले की, तिला तिची मुलगी इतरांना खूश ठेवणारी व्हावी, असं अजिबात वाटत नाही. कियारा म्हणते, "जेव्हा घरात आई-बाबांकडून खूप प्रेम मिळते, तेव्हा मुलं पालकांचं कौतुक मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. पण ही गोष्ट पुढे जाऊन इतर लोकांना खूश ठेवण्याच्या सवयीत बदलू शकते, याची जाणीव मुलांना असली पाहिजे. माझ्या मुलीने माझ्यासारखे 'पीपल प्लीझर' (लोकांना आनंदी ठेवणारी) बनावं अशी माझी मुळीच इच्छा नाही," असे कियाराने स्पष्ट केले.


कियाराने मान्य केले की, इतके मोठे स्टारडम मिळाल्यानंतरही आजही तिला तिच्या पालकांकडून मिळणाऱ्या कौतुकाची ओढ असते. ती म्हणाली, "आजही जगाने केलेले कौतुक एका बाजूला आणि आई-बाबांनी दिलेली दाद एका बाजूला असते. त्यांनी माझ्यावर कधीच दबाव टाकला नाही, पण तरीही त्यांना माझा अभिमान वाटावा, असे मला नेहमी वाटते."

कियारा पुढे म्हणाली की, सारायाहने कोणाच्याही दबावाखाली न येता स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत. "इतरांना सुखी करण्याच्या नादात तिने माझ्यासारखं स्वतःचं मत मारू नये. त्याऐवजी ती जिज्ञासू, प्रेमळ आणि इतकी आत्मविश्वासपूर्ण असावी की ती तिचे आयुष्य स्वतःच्या अटींवर जगू शकेल," अशी इच्छा कियाराने व्यक्त केली. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी १५ जुलै २०२५ रोजी त्यांच्या मुलीचे स्वागत केले होते. २८ नोव्हेंबर २०२५ रोजी तिचे नाव 'सारायाह मल्होत्रा' असल्याचे जाहीर केले होते.

Web Title : कियारा आडवाणी चाहती हैं कि उनकी बेटी उनसे अलग हो।

Web Summary : कियारा आडवाणी को उम्मीद है कि उनकी बेटी सारायाह उनकी तरह 'लोगों को खुश करने वाली' नहीं होगी। वह चाहती हैं कि वह आत्मविश्वास से भरी हो, अपने फैसले खुद ले और बिना किसी दबाव के अपनी शर्तों पर जीवन जिए।

Web Title : Kiara Advani wants her daughter to be different from herself.

Web Summary : Kiara Advani hopes her daughter Saraayah won't be a 'people pleaser' like her. She wants her to be confident, make her own decisions, and live life on her own terms, without succumbing to pressure.