Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 16:33 IST2026-05-11T16:32:04+5:302026-05-11T16:33:26+5:30
Astro Tip: शांत आणि पुरेशी झोप मिळाली नाही तर त्याचा परिणाम तब्येतीवर होतो, म्हणून उत्तम झोपेसाठी लेखात दिलेले स्तोत्र रोज झोपण्यापूर्वी ऐकावे.

Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
झोप ही आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी अत्यंत आवश्यक असते. पण अनेकदा कामाचा ताण, चिंता किंवा इतर काही कारणांमुळे शांत झोप लागत नाही आणि वाईट स्वप्ने (Nightmares) पडतात. यामुळे सकाळी उठल्यावरही थकवा आणि अस्वस्थता जाणवते. अशा वेळी आपल्या शास्त्रात एक अत्यंत प्रभावी मार्ग सांगितला आहे, कोणता ते पाहू.
हे ही वाचा : Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी आपण झोपी जातो, पण जर रात्री भयानक किंवा वाईट स्वप्ने पडली, तर मनाची शांतता भंग पावते. अनेकदा भीतीमुळे मध्यरात्री जाग येते आणि पुन्हा झोप लागणे कठीण होते. जर तुम्हालाही वारंवार वाईट स्वप्ने पडत असतील, तर 'गजेंद्र मोक्ष' स्तोत्र तुमच्यासाठी एक आध्यात्मिक वरदान ठरू शकते.
१. काय आहे 'गजेंद्र मोक्ष' स्तोत्र?
हे स्तोत्र श्रीमद्भागवत पुराणाच्या आठव्या स्कंदात आहे. जेव्हा एका बलाढ्य हत्तीला (गजेंद्र) मगरीने (ग्रह) पाण्यात पकडले होते आणि हजारो वर्षे चाललेल्या युद्धानंतर जेव्हा गजेंद्र पूर्णपणे हतबल झाला, तेव्हा त्याने भगवान विष्णूंचा धावा केला. त्यावेळी त्याने जे स्तुतीपर स्तोत्र गायले, त्याला 'गजेंद्र मोक्ष' म्हणतात.
२. वाईट स्वप्ने आणि गजेंद्र मोक्ष यांचा संबंध
ज्योतिष आणि आध्यात्मिक शास्त्रानुसार, वाईट स्वप्ने पडण्यामागे मनातील भीती, राहूचा प्रभाव किंवा पितृदोष अशी काही कारणे असू शकतात.
भयमुक्ती: गजेंद्र मोक्ष हे शरणागतीचे आणि ईश्वरी मदतीचे स्तोत्र आहे. हे ऐकल्याने मनातील सुप्त भीती निघून जाते.
संकट निवारण: ज्याप्रमाणे भगवंताने गजेंद्राला संकटातून सोडवले, त्याचप्रमाणे हे स्तोत्र ऐकणाऱ्याच्या आयुष्यातील मानसिक आणि शारीरिक संकटांचे निवारण होते.
हे ही वाचा : शनि जयंती आणि शनि अमावस्या २०२६: साडेसाती-ढय्येचा त्रास संपणार! १६ मे रोजी करा 'हे' विशेष उपाय
३. झोपण्यापूर्वी ऐकण्याचे फायदे
शांत झोप: हे स्तोत्र ऐकल्याने मेंदूतील विचारांचे चक्र थांबते आणि मन शांत होते, ज्यामुळे गाढ झोप लागण्यास मदत होते.
नकारात्मकता दूर होते: तुमच्या शयनकक्षातील (Bedroom) आणि मनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सात्विक ऊर्जेचा संचार होतो.
मानसिक बळ: ऑफिसचा ताण किंवा भविष्याची चिंता यामुळे येणारी अस्वस्थता कमी होऊन आत्मविश्वास वाढतो.
हे ही वाचा : Adhik Maas 2026: अधिक मासात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
४. विधी आणि पद्धत
रात्री झोपण्यापूर्वी हात-पाय स्वच्छ धुवून शांत बसावे.
मोबाईलवर किंवा म्युझिक सिस्टीमवर 'गजेंद्र मोक्ष' स्तोत्र लावावे.
डोळे मिटून त्यातील शब्दांवर लक्ष केंद्रित करावे.
जर तुम्हाला संस्कृत वाचता येत असेल, तर स्वतः पठण करणे अधिक फलदायी ठरते.