Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 10:28 IST2026-05-11T10:26:22+5:302026-05-11T10:28:40+5:30

Adhik Maas 2026: काय आहे 'वेणीमाधव' वात? ३३ वातींच्या या दैवी गुंफणाचे रहस्य तुम्हाला माहित आहे का?

Adhik Maas 2026: Why is Venimadhav Vat used more frequently? What are its features, importance and benefits? Read | Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा

Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा

हिंदू धर्मात दिव्याला आणि त्यातील वातीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कार्तिक मास असो किंवा घरातील विशेष पूजा-विधी, विविध प्रकारच्या वाती प्रज्वलित करण्याची परंपरा आपल्याकडे जोपासली जाते. या सर्व वातींमध्ये सर्वात आगळीवेगळी आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत प्रभावशाली मानली जाणारी वात म्हणजे 'वेणीमाधव' वात.आपल्या देव्हाऱ्यात दिवा लावणे हे केवळ अंधार दूर करण्याचे प्रतीक नाही, तर ते ईश्वरी चैतन्य जागृत करण्याचे माध्यम आहे. वातींच्या विविध प्रकारांमध्ये 'वेणीमाधव' वातीला 'सर्वश्रेष्ठ' स्थान दिले जाते. ही वात केवळ आकाराने मोठी नाही, तर त्यामागे एक गहन आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे.

हे ही वाचा : सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!

१. ३३ फुलवातींची अद्वितीय गुंफण

वेणीमाधव वातीचे सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिची बनावट. ही वात ३३ सुट्या फुलवाती एकत्र गुंफून तयार केली जाते. हिंदू शास्त्रानुसार, ३३ हा आकडा '३३ कोटी' (म्हणजेच ३३ प्रकारच्या) देवशक्तींचे प्रतिनिधित्व करतो. जेव्हा या ३३ वाती एका वेणीसारख्या गुंफल्या जातात, तेव्हा त्या एका प्रचंड ऊर्जेचे प्रतीक बनतात.

२. वेणीमाधव: ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप

'वेणीमाधव' हे नावच अतिशय अर्थपूर्ण आहे. ही वात म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींच्या एकत्रित शक्तीचे रूप मानली जाते. ज्याप्रमाणे या तीन देवता सृष्टीची निर्मिती, पालन आणि लय करतात, त्याचप्रमाणे ही वात प्रज्वलित केल्याने घरातील नकारात्मकतेचा नाश होऊन सात्विक ऊर्जेची निर्मिती होते.

हे ही वाचा : Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!

३. प्रयागराज आणि त्रिवेणी संगमाशी नाते

वेणीमाधव वातीचा संबंध थेट उत्तर प्रदेशातील प्रयागराज क्षेत्राशी आहे. प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन पवित्र नद्यांचा 'त्रिवेणी संगम' होतो.

असे मानले जाते की, या संगमावर भगवान वेणीमाधव यांचे माता लक्ष्मीसह कायमचे वास्तव्य असते.

प्रयागराजचे 'क्षेत्रपाल' म्हणूनही भगवान वेणीमाधव यांना पुजले जाते.

ही वात लावणे म्हणजे आपल्या घराच्या देव्हाऱ्यात प्रयागराजच्या त्या पवित्र त्रिवेणी संगमाची पुण्याई आणि आशीर्वाद मिळवण्यासारखे आहे.

अधिक मासात एकदा तरी ही वात अवश्य लावावी. 

४. वेणीमाधव वात लावण्याचे महत्त्व आणि फायदे

लक्ष्मी प्राप्ती: या वातीत लक्ष्मीसह वेणीमाधवांचे वास्तव्य असल्याने, ही वात प्रज्वलित केल्याने घरात सुख-समृद्धी आणि स्थिर लक्ष्मी नांदते.

पापांचा नाश: त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने जी पुण्याई मिळते, तीच पुण्याई मनोभावे वेणीमाधव वात लावल्याने मिळते, अशी भक्तांची श्रद्धा आहे.

कार्तिक मासाचे विशेष महत्त्व: विशेषतः कार्तिक महिन्यात किंवा अधिक मासात ही वात लावल्याने अनंत पटीने पुण्य फळ मिळते.

कौटुंबिक शांतता: त्रिमूर्तींच्या आशीर्वादाने घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि ताळमेळ वाढतो.

कशी प्रज्वलित करावी?

ही वात आकाराने मोठी असल्याने ती तुपात नीट भिजवून एका मोठ्या निरांजनात किंवा समईत प्रज्वलित केली जाते. ३३ वातींची ही गुंफण जेव्हा तेवते, तेव्हा त्याचा प्रकाश आणि ऊर्जा संपूर्ण घराला व्यापून टाकते.

हे ही वाचा : स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 

घरातील ज्येष्ठ बायका या वाती करत असत, आता पूजेचे सामान मिळते अशा ठिकाणी या वाती सहज मिळतात. त्याचप्रमाणे युट्युबवर देखील ही वात कशी करावी याचे व्हिडीओ आहेत, त्यानुसार या वाती घरच्या घरी तयार करता येतील.  उदाहरणादाखल मकरंद करंदीकर यांनी शेअर केलेला फोटो पाहता येईल. 

Web Title : Adhik Maas 2026: वेणी माधव वात का महत्व और लाभ।

Web Summary : 33 बत्तियों से बनी वेणी माधव वात दिव्य ऊर्जा और त्रिमूर्ति का प्रतीक है। अधिक मास में इसे जलाने से समृद्धि आती है, नकारात्मकता दूर होती है और सद्भाव बढ़ता है। यह प्रयागराज के त्रिवेणी संगम से जुड़ा है, जो आशीर्वाद और आध्यात्मिक योग्यता प्रदान करता है।

Web Title : Adhik Maas 2026: Significance and benefits of the Veni Madhav lamp.

Web Summary : The Veni Madhav lamp, made of 33 wicks, represents divine energy and the trinity. Lighting it during Adhik Maas brings prosperity, removes negativity, and fosters harmony. It's linked to Prayagraj's Triveni Sangam, bestowing blessings and spiritual merit.