"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 10:27 IST2026-05-11T10:22:43+5:302026-05-11T10:27:19+5:30
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर तेलाचे संकट गडद होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर संयमाने करण्याचे आवाहन केले आहे.

"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर तेलाचे संकट गडद होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर संयमाने करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, पंतप्रधानांच्या या 'सल्ल्यावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. "मोदींनी दिलेले सल्ले हे उपदेश नसून त्यांच्या अपयशाचे पुरावे आहेत," अशा शब्दांत गांधींनी निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच जनतेला काही गोष्टींचा त्याग करण्याचे आवाहन केले होते. यामध्ये सोनं न खरेदी करणे, परदेशात न जाणे, पेट्रोलचा वापर कमी करणे, खतं आणि खाद्यतेलाचा वापर मर्यादित करणे, मेट्रोने प्रवास करणे आणि 'वर्क फ्रॉम होम'ला प्राधान्य देणे अशा मुद्द्यांचा समावेश होता. यावर राहुल गांधींनी ट्विट करत मोदी सरकारला धारेवर धरले आहे.
राहुल गांधींची टीका
"१२ वर्षांत देशाला अशा वळणावर आणून ठेवले आहे की, आता जनतेला काय खरेदी करावे आणि कुठे जावे हे सांगावे लागत आहे. स्वतःच्या जबाबदारीतून पळ काढण्यासाठी प्रत्येक वेळी दोष जनतेवर टाकला जातो. देश चालवणे आता 'कॉम्प्रमाईज्ड पीएम' च्या बसची गोष्ट राहिलेली नाही, असा निशाणा राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.
राहुल गांधींच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, भाजपकडून यावर काय प्रत्युत्तर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोदी जी ने कल जनता से त्याग मांगे - सोना मत ख़रीदो, विदेश मत जाओ, पेट्रोल कम जलाओ, खाद और खाने का तेल कम करो, मेट्रो में चलो, घर से काम करो।
ये उपदेश नहीं - ये नाकामी के सबूत हैं।
12 साल में देश को इस मुक़ाम पर ला दिया है कि जनता को बताना पड़ रहा है - क्या ख़रीदे, क्या न…— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 11, 2026