“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 16:27 IST2026-05-11T16:25:49+5:302026-05-11T16:27:57+5:30

Deputy CM Sunetra Pawar In Konkan: दादांचे प्रेम कोकणावर होते, तसेच माझेही कोकणावर प्रेम राहील, असा शब्द सुनेत्रा पवार यांनी दिला.

deputy cm sunetra ajit pawar said konkan is truly the land of god and the backbone of maharashtra development | “कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार

“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार

Deputy CM Sunetra Pawar In Konkan: कोकण म्हणजे साक्षात देवभूमी असून इथल्या लोकांनी ती कष्टाने तयार केली आहे. कोकण हा महाराष्ट्राच्या विकासाचा कणा आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी कोकणविषयी कौतुकास्पद उद्गार काढले. रोहा-अष्टमी नगर परिषदेच्या हद्दीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजने झाली. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत सुनेत्रा अजित पवार बोलत होत्या. 

अजित दादा नेहमी कोकणाची बाजू घेत असत. दादांना इथल्या लोकांविषयी अपार जिव्हाळा होता. मी हे का सांगतेय, कारण मी त्यांची सहचारिणी असल्याने त्याबाबत माहिती आहे. दादांना इथली लोक खूप आवडायची, अशी आठवणही सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितली. 

विकास म्हणजे निव्वळ सिमेंटचे रस्ते नाही तर...

विकास म्हणजे निव्वळ सिमेंटचे रस्ते नाही तर लोकांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणि त्यातून त्यांना सुख कसे मिळेल हा खरा प्रयत्न आमचा असणार आहे. अदिती ही माझी मुलगी म्हणून तिच्या मतदारसंघाकडे लक्ष देणार आहे, असे सांगतानाच दादांचे प्रेम कोकणावर होते, तसेच माझेही कोकणावर प्रेम राहील, असा शब्द सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी दिला. आजपर्यंत आम्ही दादांशिवाय कधी कार्यक्रम केला नाही, असे सुनील तटकरे यांनी सांगितले होते. दादांनी जी सुरू केलेली परंपरा आहे, ती कायम सुरू ठेवेन, असा शब्द दिला आणि या कार्यक्रमाला आले, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. 

दरम्यान, रोहा शहराच्या भविष्याला सुरुवात करणारा असा क्षण असल्याचे सांगतानाच सर्व कामांचे भूमिपूजन झाल्याचे सुनेत्रा अजित पवार यांनी जाहीर केले. 

Web Title : कोंकण महाराष्ट्र की रीढ़, एक दिव्य भूमि: सुनेत्रा पवार

Web Summary : सुनेत्रा पवार ने कोंकण को एक स्व-निर्मित दिव्य भूमि और महाराष्ट्र की रीढ़ बताया। रोहा में एक कार्यक्रम में बोलते हुए, उन्होंने अजित दादा के कोंकण के प्रति प्रेम पर प्रकाश डाला और आर्थिक समृद्धि पर ध्यान केंद्रित करते हुए, उनकी विरासत को जारी रखते हुए इसके विकास के लिए प्रतिबद्धता जताई।

Web Title : Konkan is Maharashtra's backbone, a divine land: Sunetra Pawar

Web Summary : Sunetra Pawar praised Konkan as a self-made divine land and Maharashtra's backbone. Speaking at a Roha event, she highlighted Ajit Dada's love for Konkan and committed to its development, focusing on economic prosperity, continuing his legacy.