Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 14:19 IST2026-05-11T14:18:52+5:302026-05-11T14:19:45+5:30

Daily Worship: दैनंदिन उपासनेत लेखात दिलेल्या श्लोकाचा समावेश केला असता तुम्हाला निरोगी दिर्घआयुष्य लाभेल; श्लोक, अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या. 

Daily Worship: Want a 100-year life and a healthy body? Then recite this powerful verse every morning | Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक

Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक

हिंदू धर्मात अशा काही थोर व्यक्तींचा उल्लेख आढळतो, ज्यांना काळाचे बंधन नाही. त्यांना आपण 'चिरंजीवी' म्हणतो. अनेकदा आपल्याला या सात किंवा आठ महान व्यक्तींची नावे आठवत नाहीत. पण आपल्या पूर्वजांनी ही नावे लक्षात ठेवण्यासाठी एक अतिशय सुंदर आणि सोपा 'श्लोक' तयार केला आहे.

हे ही वाचा : शनि जयंती आणि शनि अमावस्या २०२६: साडेसाती-ढय्येचा त्रास संपणार! १६ मे रोजी करा 'हे' विशेष उपाय

भारतीय संस्कृतीत अशा काही महान विभूती आहेत ज्या आजही आपल्यामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपात अस्तित्वात आहेत असे मानले जाते. या व्यक्तींना 'सप्त चिरंजीवी' म्हटले जाते. या आठ व्यक्तींचे स्मरण केल्याने माणसाला आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते, असे शास्त्रात सांगितले आहे.

तो चमत्कारिक श्लोक पुढीलप्रमाणे:

अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः।
कृपः परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः॥
सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।
जीवेद्वर्षशतं सोऽपि सर्वव्याधिविवर्जित ॥

अर्थ: अश्वत्थामा, राजा बळी, वेदव्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य आणि परशुराम - हे सात चिरंजीवी आहेत. आणि आठवे ऋषी मार्कण्डेय यांचे जो दररोज सकाळी उठून स्मरण करतो, त्याला १०० वर्षांचे दीर्घायुष्य मिळते आणि तो सर्व रोगांपासून मुक्त राहतो.

हे ही वाचा : Adhik Maas 2026: अधिक मासात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा

चला जाणून घेऊया महान व्यक्तींबद्दल:

१. अश्वत्थामा: गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र, ज्याला अमरत्व मिळाले. 
२. राजा बळी: आपल्या दानशूरपणासाठी प्रसिद्ध असलेला असुर राजा.
३. वेदव्यास: महाभारत आणि १८ पुराणांचे रचयिता.
४. हनुमान: प्रभू श्रीरामाचे परम भक्त आणि शक्तीचे प्रतीक.
५. विभीषण: रावणाचा धाकटा भाऊ, ज्याने धर्माची साथ दिली.
६. कृपाचार्य: कौरव आणि पांडवांचे कुलगुरू.
७. परशुराम: भगवान विष्णूंचे सहावे अवतार, ज्यांनी पृथ्वीला अधर्मातून मुक्त केले.
८. मार्कण्डेय ऋषी: भगवान महादेवांचे परम भक्त, ज्यांनी मृत्यूवर विजय मिळवला होता.

हे ही वाचा : सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!

दररोज स्मरण करण्याचे फायदे

दीर्घायुष्य: श्लोकात म्हटल्याप्रमाणे, 'जीवेद्वर्षशतं' म्हणजेच शंभर वर्षे आयुष्य प्राप्त होते.

आरोग्य: 'सर्वव्याधिविवर्जित' - शरीरातील व्याधी (रोग) दूर राहण्यास मदत होते.

सकारात्मक ऊर्जा: या महान व्यक्तींचे गुण आणि त्यांचे कार्य आठवल्याने मनात सकारात्मक विचारांचा संचार होतो.

Web Title : लंबी, स्वस्थ जीवन के लिए प्रतिदिन इस श्लोक का जाप करें।

Web Summary : हिंदू शास्त्रों के अनुसार, प्रतिदिन आठ अमर लोगों का स्मरण करने से दीर्घायु और स्वास्थ्य की प्राप्ति होती है। अश्वत्थामा, बलि, व्यास, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम और मार्कंडेय का उल्लेख करने वाले श्लोक का जाप करने से सकारात्मक ऊर्जा और रोग मुक्त सौ वर्ष का जीवन प्राप्त होता है।

Web Title : Chant this shloka daily for a long, healthy life.

Web Summary : Hindu scriptures say remembering eight immortals daily grants longevity and health. Recite the shloka mentioning Ashwatthama, Bali, Vyasa, Hanuman, Vibhishana, Kripacharya, Parashurama, and Markandeya to gain positive energy and a disease-free, hundred-year life.