Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:05 IST2026-05-11T13:03:47+5:302026-05-11T13:05:06+5:30
Jeetu Munda : जीतू मुंडा असं या व्यक्तीचं नाव असून ते ओडिशाचे रहिवासी आहेत. याच दरम्यान आता जीतू यांचं नशीब पालटलं आहे, त्यांना लाखो रुपयांची मदत मिळाली आहे.

Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील एका व्हिडिओने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती आपल्या बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत जात असल्याचं पाहायला मिळालं. आपल्या मृत बहिणीच्या खात्यात असलेले १९,००० रुपये काढण्यासाठी त्या व्यक्तीला बहिणीचा मृत्यू झाल्याचा पुरावा बँकेला द्यायचा होता. जीतू मुंडा असं या व्यक्तीचं नाव असून ते ओडिशाचे रहिवासी आहेत. याच दरम्यान आता जीतू यांचं नशीब पालटलं आहे, त्यांना लाखो रुपयांची मदत मिळाली आहे.
जीतू मुंडा यांना त्यांच्या बहिणीच्या खात्यातील १९ हजार रुपये काढायचे होते. त्यांच्या बहिणीचा मृत्यू काही महिन्यांपूर्वीच झाला होता. जेव्हा ते बँकेत गेले, तेव्हा बँकेकडून सांगण्यात आलं की, "बहिणीला घेऊन या, तरच पैसे मिळतील." या उत्तरामुळे हताश झालेल्या जीतू यांनी चक्क बहिणीचा सांगाडा बाहेर काढला आणि कित्येक किलोमीटर तो खांद्यावर घेऊन जाऊन बँक गाठली. हेच दृश्य इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झालं होतं.
यह वीडियो देख कर शून्य हूँ
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) April 28, 2026
ओडिशा के जीतू मुंडा के कंधे पर उनकी बहन का कंकाल है. बहन की मृत्यु हो गई
बैंक से 19,300 रुपए निकालने थे
बैंक वालों ने इतने चक्कर लगवाए, इतने काग़ज़ मांगे कि थक हार कर यह कदम उठाया
इन्हीं बैंकों से धन्ना सेठों के 16 लाख करोड़ माफ होते हैं, लेकिन… pic.twitter.com/I6vwqQ2hZ6
जीतू मुंडा यांना मिळाली लाखो रुपयांची मदत
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप आणि सहानुभूती व्यक्त करण्यात आली. बँकेतील जमा रक्कमेव्यतिरिक्त अनेक संस्थांनी त्यांना आर्थिक मदत केली आहे. यामध्ये सर्वात मोठं नाव 'फिजिक्स वाला' CEO अलख पांडे यांचं आहे, त्यांनी जीतू यांना १० लाख रुपयांची मदत दिली आहे. तसेच, राजस्थानच्या कृषी मंत्र्यांनीही आपला एका महिन्याचा पगार (सुमारे १.४५ लाख रुपये) जीतू यांना दिला आहे. असे एकूण १५ लाख जीतू यांना मिळाले आहेत.
बँक मॅनेजरचा खुलासा
या प्रकरणाबाबत जेव्हा बँक मॅनेजरला विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी आपली बाजू मांडताना सांगितलं की, "मी फक्त कागदपत्रं मागितली होती, सांगाडा आणायला सांगितला नव्हता." मात्र, जीतू मुंडा आपल्या दाव्यावर ठाम आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, मॅनेजरने स्पष्टपणे "बहिणीला घेऊन या" असंच सांगितलं होतं, म्हणूनच त्यांना हे पाऊल उचलावं लागलं.