'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:38 IST2026-05-11T13:38:09+5:302026-05-11T13:38:26+5:30

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

Jayant Patil should take his mother's oath and say so! Padalkar's direct challenge on Vishal Patil's MPship | 'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका

'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका

सांगली: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला. सांगली लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्या विजयाबाबत जयंत पाटील यांच्या मनात नेमकी कोणती भूमिका होती, यावरून पडळकरांनी संशय व्यक्त करत टीका केली.

मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष

आमदार पडळकर म्हणाले की, "विशाल पाटील यांना खासदार करण्याची जयंत पाटील यांची मनापासून इच्छा होती का? जर असेल तर त्यांनी आपल्या आईची शपथ घेऊन सांगावं." या आव्हानामुळे सांगलीतील लोकसभेच्या निवडणुकीत जयंत पाटलांनी पडद्यामागून नेमकी कोणती खेळी खेळली, या जुन्या वादाला पुन्हा तोंड फुटले आहे.

यावेळी पडळकरांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरूनही टोला लगावला. "महाराष्ट्रातील अनेक प्रस्थापित नेत्यांच्या मुलांचं राजकारणात लॉन्चिंग झालं, मात्र जयंत पाटील यांना आपल्या मुलाला लॉन्च करता आलं नाही. याचं त्यांना सर्वाधिक दुःख आहे आणि तोच राग ते व्यक्त करत आहेत," अशी टीका पडळकरांनी केली.

कांदा प्रश्नावरही दिली प्रतिक्रिया

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक मार्ग काढतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच, अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप ज्या पद्धतीने हिंदू धर्म, परंपरा आणि सामाजिक विषयांवर अभ्यासपूर्ण काम करत आहेत, त्यांच्या त्या भूमिकेला पडळकर यांनी आपला जाहीर पाठिंबा दर्शवला.

Web Title : पड़लकर ने जयंत पाटिल की आलोचना की, विशाल पाटिल की जीत पर मंशा पर सवाल

Web Summary : गोपीचंद पड़लकर ने जयंत पाटिल को विशाल पाटिल की लोकसभा जीत के इरादों पर अपनी मां की कसम खाने की चुनौती दी। उन्होंने पाटिल पर वंशवादी राजनीति से मोहभंग का आरोप लगाया और फडणवीस के प्याज किसान समाधान और विधायक जगताप के हिंदू समर्थक रुख का समर्थन किया।

Web Title : Padalkar Criticizes Jayant Patil, Questions Intentions on Vishal Patil's Victory

Web Summary : Gopichand Padalkar challenges Jayant Patil to swear on his mother regarding Vishal Patil's Lok Sabha victory intentions. He accuses Patil of dynastic politics frustration and supports Fadnavis's onion farmer solution and MLA Jagtap's pro-Hindu stance.