Nida Khan : टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 11:17 IST2026-05-12T11:15:05+5:302026-05-12T11:17:16+5:30

Nashik TCS Case Nida Khan : टीसीएस कंपनीत धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या निदा खानला सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान याच संदर्भातील अन्य गुन्ह्यात तिला पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे.

Nida Khan sent to judicial custody in TCS case, possibility of arrest in another case | Nida Khan : टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता

Nida Khan : टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता

नाशिक: टीसीएस कंपनीत धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या निदा खानला सोमवारी (दि. ११) न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान याच संदर्भातील अन्य गुन्ह्यात तिला पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे.

सोमवारी (दि. ११) निदाला नाशिक रोड न्यायालयात हजर करण्यात आले. ४० दिवसांपासून फरार असलेल्या निदाला छत्रपती संभाजीनगरातून अटक करण्यात आल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. धर्म परिवर्तनाच्या कटातही तिचा सहभाग निष्पन्न झाल्याने या गुन्ह्यात मुंबई नाका पोलिसांनाही निदा खान हवी होती. त्यामुळे निदा खानला पुन्हा पोलीस कोठडीत जावे लागू शकते.  तिला पहिल्या गुन्ह्यात जामीन अर्ज दाखल करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.

टीसीएस प्रकरणात मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात गुन्हेगारी स्वरूपाच्या धर्मातराच्या कटात निदाचा सहभाग पोलीस तपासातून पुढे आला होता. यामुळे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यापाठोपाठ निदा आता या गुन्ह्यातही पोलिसांना हवी असल्याने पहिल्या गुन्ह्यात तिला न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी दुसऱ्या गुन्ह्यात तिच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. निदा गर्भवती असल्याने तिला न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी विनंती तिच्या वकिलांनी केली होती. 

 ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य

पीडितेच्या मोबाईलमध्ये १७१ रील्स

निदा खान तसेच इतर संशयित आरोपींनी धर्म परिवर्तनाच्या उद्देशाने तब्बल १७१ रील्स पीडितेच्या मोबाइलवर पाठविल्याची धक्कादायक बाब आता पोलीस तपासात पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे निदाच्या मोबाइलमधून अनेक बाबींचा उलगडा होईल.

याशिवाय निदाला फरार होण्यास मदत करणाऱ्या नाशिकमधील दोघांची चौकशी झाल्याची माहितीही पोलीस सूत्रांनी दिली. तसेच पीडितेच्या घरी जाऊन निदा खान हिने धार्मिक शिक्षण दिल्याचेही स्पष्ट झाले आहे.
 

Web Title : टीसीएस मामले में निदा खान न्यायिक हिरासत में, गिरफ्तारी की संभावना

Web Summary : टीसीएस धर्मांतरण मामले में गिरफ्तार निदा खान को न्यायिक हिरासत में भेजा गया। संबंधित अपराध में फिर से गिरफ्तारी की आशंका है। पुलिस जांच में पीड़िता के फोन पर रील भेजकर धार्मिक कट्टरता फैलाने का खुलासा हुआ।

Web Title : Nida Khan remanded to judicial custody in TCS case, arrest likely

Web Summary : Nida Khan, arrested in the TCS conversion case, is remanded to judicial custody. She faces potential re-arrest in a related offense. Police investigations revealed religious indoctrination via reels sent to the victim's phone.