Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या कुटुंबात कोण कोण? अभिनेत्रीने शेअर केला फॅमिली फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 11:20 IST2026-05-12T11:15:45+5:302026-05-12T11:20:46+5:30
प्राजक्ताने नुकतंच तिचा फॅमिली फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचं संपूर्ण कुटुंब पाहायला मिळत आहे.

प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे.

प्राजक्ता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती कुटुंबीयांसोबतचे फोटो शेअर करत असते.

प्राजक्ताने नुकतंच तिचा फॅमिली फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचं संपूर्ण कुटुंब पाहायला मिळत आहे.

फोटो शेअर करत अभिनेत्रीने तिच्या कुटुंबात कोण कोण आहे, याची ओळख चाहत्यांना करून दिली आहे.

या फोटोमध्ये प्राजक्ताच्या कुटुंबातील ४ जनरेशन एकत्र दिसत आहेत. एका कार्यक्रमातील हा फोटो आहे.

"आजी-आजोबा, त्यांच्या दोन मुली+ मुलींचे नवरे. मोठ्या मुलीची दोन पोरं. (म्हणजे आई-आम्ही दोघे) पोराची बायको आणि त्याच्या पोरी", असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.

प्राजक्ताने शेअर केलेल्या फॅमिली फोटोवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

















