Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 10:20 IST2026-05-11T10:19:29+5:302026-05-11T10:20:32+5:30

Chandranath Rath And Suvendu Adhikari : पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांचे PA चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे आहे. पश्चिम बंगाल पोलिसांच्या STF ने या प्रकरणी तीन जणांना अटक केली असून यात एका कुख्यात 'हिस्ट्रीशीटर'चा समावेश आहे.

Suvendu Adhikari pa Chandranath Rath murder case history sheeter arrested from up and bihar | Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक

Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक

पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांचे PA चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे आहे. पश्चिम बंगालपोलिसांच्या STF ने या प्रकरणी तीन जणांना अटक केली असून यात एका कुख्यात 'हिस्ट्रीशीटर'चा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहार आणि उत्तर प्रदेशमधून तिघांना अटक करण्यात आली आहेत. पोलीस लवकरच पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा पूर्ण खुलासा करणार आहेत. 

६ मे रोजी रात्री २४ परगणा जिल्ह्यात चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. गोळीबार प्रकरणात बंगाल STF ने बिहारच्या बक्सर जिल्ह्यातून विशाल श्रीवास्तव नावाच्या हिस्ट्रीशीटरला अटक केली आहे. बिहार पोलीस आणि बक्सरमधील मुफसिल पोलिसांच्या मदतीने त्याला पांडे पट्टी गावातून ताब्यात घेण्यात आलं आहे.

 "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

विशाल श्रीवास्तववर १५ हून अधिक गुन्हे

विशाल श्रीवास्तव हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर हत्या, लूटमार आणि दरोड्यासारखे १५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी तो मुख्य संशयित होता. बिहार एसटीएफ आणि बक्सर पोलिसांच्या समन्वयाने ही छापेमारी करण्यात आली. अटकेनंतर बंगाल एसटीएफ त्याला कोलकाता येथे घेऊन गेली आहे.

"मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक

राज सिंह आणि मयंकला बेड्या

इतर दोन आरोपींची नावं राज सिंह आणि मयंक अशी आहेत. राज सिंह हा मूळचा बलियाचा रहिवासी असला तरी तो बक्सरमध्ये राहत होता. हत्येनंतर तो अयोध्येत लपून बसला होता. कोलकाता आणि अयोध्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करत राज सिंहला अटक केली. तपासात समोर आले आहे की, राज सिंह या हत्येच्या कटात सामील होता. याच दरम्यान, या आरोपींनी स्वतः गोळ्या झाडल्या की इतर कोणाकडून हे कृत्य करून घेतलं, याचा खुलासा पोलीस लवकरच करतील.

 Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी

UPI पेमेंटमुळे फुटलं बिंग

या प्रकरणाच्या तपासात हावडा येथील एका टोल प्लाझावर आरोपींनी केलेल्या युपीआय पेमेंटमुळे पोलिसांना महत्त्वाचा पुरावा मिळाला. तपासादरम्यान असं आढळलं की, हत्येसाठी वापरलेली कार हल्ल्यापूर्वी 'बल्ली टोल प्लाझा'वरून गेली होती. तिथे कारमधील व्यक्तींनी युपीआयद्वारे टोल भरला होता. या व्यवहारामुळे पोलिसांना आरोपीचा मोबाईल नंबर मिळाला. तसेच टोल प्लाझावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये गाडी आणि आरोपींचे चेहरे स्पष्टपणे कैद झाले आहेत.
 

Web Title : सुवेंदु अधिकारी के PA चंद्रनाथ हत्याकांड: कुख्यात अपराधी समेत तीन गिरफ्तार

Web Summary : सुवेंदु अधिकारी के PA चंद्रनाथ रथ की हत्या के मामले में तीन गिरफ्तार। पश्चिम बंगाल STF ने बिहार, यूपी से गिरफ्तारियां कीं। गिरफ्तार लोगों में एक कुख्यात हिस्ट्रीशीटर भी शामिल है। UPI भुगतान से पुलिस को संदिग्धों को ट्रैक करने में मदद मिली।

Web Title : Suvendu Adhikari's PA Murder: Three Arrested, Including Notorious History-Sheeter

Web Summary : Three arrested in connection with Chandranath Rath's murder, Suvendu Adhikari's PA. West Bengal STF made arrests from Bihar, UP. A history-sheeter is among those held. UPI payment helped police track suspects.