Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 11:33 IST2026-05-08T11:30:00+5:302026-05-08T11:33:39+5:30
TMC Mahua Moitra : तृणमूल काँग्रेसच्या लोकसभा खासदार महुआ मोइत्रा यांनी गुरुवारी नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडे (DGCA) अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

Mahua Moitra : Video - "चोर-चोर, TMC चोर"; निकालानंतर महुआ मोइत्रांना पाहून विमानात प्रवाशांची घोषणाबाजी
तृणमूल काँग्रेसच्या लोकसभा खासदार महुआ मोइत्रा यांनी गुरुवारी नागरी विमान वाहतूक संचालनालयाकडे (DGCA) अधिकृत तक्रार दाखल केली आहे. संरक्षण विषयक संसदीय स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला जात असताना इंडिगोच्या विमानात काही लोकांनी त्यांचा छळ केल्याचा आरोप महुआ यांनी केला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एका पोस्टमध्ये महुआ मोइत्रा यांनी म्हटलं की, ही घटना इंडिगोच्या 'फ्लाईट 6E 719' मध्ये घडली. त्यांनी असा दावा केला की, विमान लँड होताच आणि दरवाजे उघडण्यापूर्वी अनेक लोकांनी त्यांना पाहून घोषणाबाजी सुरू केली आणि या घटनेचा व्हिडीओ देखील बनवला.
ALERT! i travelled to Delhi today on official work to attend meeting of Parliamentary Standing Committee on Defence. Was on seat 1F on 6E 719. 4-6 men boarded in a group & leered at me & went to back of plane. When flight landed & before doors opened this is what they did &… pic.twitter.com/QE0SwrUY8I
— Mahua Moitra (@MahuaMoitra) May 7, 2026
"चोर-चोर, टीएमसी चोर"
टीएमसी खासदाराने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असं दिसून येतं की, त्यांना पाहून काही लोकांनी "चोर-चोर, टीएमसी चोर" अशा मोठमोठ्याने घोषणा दिल्या. या घोषणा टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात होत्या. मोइत्रा यांनी या घटनेला छळ म्हटलं असून यामुळे विमानात त्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचं सांगितलं आहे.
मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
"ही भाजपाची संस्कृती"
'एक्स'वरील पोस्टमध्ये महुआ मोइत्रा म्हणाल्या, "हा लोकांचा संताप नाही, तर हा छळ आहे आणि विमानात माझ्या सुरक्षेचं उल्लंघन आहे. कोणत्याही परिस्थितीत हे गुंड विमानाच्या आत अशा प्रकारचं कृत्य करून सुटू शकत नाहीत." त्यांनी पुढे असंही म्हटलं की, "ही भाजपाची संस्कृती आहे, यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे?"
"सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
२०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
मोइत्रा यांनी सांगितले की, सुरुवातीला त्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं आणि संसदीय बैठकीत सहभागी झाल्या. मात्र, सोशल मीडियावर व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांनी या घटनेबद्दल जाहीरपणे बोलण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.