Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 11:24 IST2026-05-08T11:18:45+5:302026-05-08T11:24:54+5:30
अमेरिकेने इराणच्या लष्करी ठिकाणांवर हल्ले केले. अमेरिकेच्या या कारवाईनंतर बिथरलेल्या इराणने अमेरिकेला भयंकर हल्ल्याने उत्तर देऊ अशी धमकी दिली आहे.

Iran US War: "पुन्हा पुन्हा तीच चूक कराल, तर आणखी विध्वसंक उत्तर देऊ ", इराणची अमेरिकेला धमकी
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी अमेरिकेने इराणच्या जहाजांवर हल्ले केले. त्यानंतर आता दावा केला की अमेरिकेच्या लष्कराने इराणच्या लष्करी तळावर बॉम्बवर्षावर केला आहे. अमेरिकेच्या या कारवाईवरून इराणने हल्ल्याचे उत्तर विध्वंसक हल्ल्यानेच देऊ अशी धमकी दिली आहे.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बकाई यांनी एक्स वर एक पोस्ट केली आहे. त्यांनी म्हणीचा उल्लेख करत अमेरिकेला पुन्हा पुन्हा एकच चूक करू नका. वेगवेगळे उत्तर येणार नाही. उत्तर हल्ल्यानेच दिले जाईल असा अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.
"वाघाचे बाहेर आलेले दात बघून तु्म्ही समजत असाल की, वाघ हसत आहे, तर असं समजण्याची चूक करू नका", असे बकाई म्हणाले.
"सागरी नियमांचा अनादर करू नका"
बकाई यांच्याबरोबरच इराणमधील खासदार आणि राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण समितीचे प्रमुख इब्राहीम अजीजी यांनीही अमेरिकेला नीट राहा, असे इशारा दिला आहे.
अजीजींनी एक्सवर पोस्ट लिहित म्हटले की, "पुन्हा पुन्हा तीच चूक केली म्हणून आम्ही वेगवेगळे उत्तर देणार नाही. तेच उत्तर मिळेल आणि ते विध्वंसक असेल. इराणच्या नवीन सागरी नियमांचा सन्मान ठेवा."
अमेरिकेचे अध्यक्ष इराणबद्दल काय बोलले होते?
इराणमधून अशा प्रतिक्रिया येण्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या जहाजांना उडवल्याची माहिती दिली होती.
"आधी इराणने अमेरिकेच्या जहाजांवर हल्ला केला. आमचे तीन अमेरिकन डिस्ट्रॉयर होते, ते होर्मुझ सामुद्रधुनीतून कोणतीही हानी न होता निघून गेले. प्रत्युत्तरात आम्ही इराणची छोटी जहाजे पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहेत. अमेरिकेच्या जहाजांना लक्ष्य करण्यासाठी आलेल्या मिसाईल्सही आम्ही सहजपणे पाडल्या आहेत", असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते.