'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 09:26 IST2026-05-11T09:00:06+5:302026-05-11T09:26:06+5:30

राणे यांच्या या विधानामुळे आता राजकीय वातावरण तापलं असून, यावर एआयएमआयएम काय प्रत्युत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

'Asaduddin Owaisi is like Osama bin Laden, there is no difference between them', says Minister Nitesh Rane | 'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान

'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान

मंत्री नितेश राणे यांनी एआयएमआयएम आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जहरी टीका केली. नितेश राणे यांनी ओवेसींची तुलना दहशतवादी ओसामा बिन लादेनशी केली असून, एआयएमआयएम ही एक दहशतवादी संघटना असल्याचा खळबळजनक आरोप केला त्यांनी आहे.

नितेश राणे म्हणाले की, "ओसामा बिन लादेन आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यात कोणताही फरक नाही. जे काम लादेन अल-कायदाच्या माध्यमातून करायचा, तेच काम आता ओवेसी एआयएमआयएमच्या माध्यमातून करत आहेत. निवडून आल्यापासून त्यांनी समाजहिताचं कोणतं मोठं काम केलं? त्यांच्या जाहीरनाम्यात फक्त 'जिहाद' पुकारण्याचाच अजेंडा असतो."

Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा

बंदीची मागणी

नितेश राणे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी केंद्र सरकारकडे मोठी मागणी केली आहे. "ज्या पद्धतीने केंद्र सरकारने पीएफआय या संघटनेवर बंदी घातली, त्याच धर्तीवर एआयएमआयएमवर देखील तात्काळ बंदी घालण्यात यावी," असे राणे म्हणाले.

राणे यांच्या या विधानामुळे आता राजकीय वातावरण तापलं असून, यावर एआयएमआयएम काय प्रत्युत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

वारिस पठाण निदा खानबद्दल काय म्हणाले होते?

एआयएमआयएम नेते वारिस पठाण यांनी नाशिक टीसीएस प्रकरणावर भाष्य केले होते. "निदा खान यांना अटक करून कोठडीत पाठवण्यात आले आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यापूर्वीच, 'गोदी मीडिया'ने त्यांना दहशतवादी घोषित करून एक मोठा मीडिया ट्रायल सुरू केला. हे चालवणारे हे लोक कोण? जर खटला चालवायचाच असेल, तर त्यांनी न्यायालये बंद करावीत, असेही ते म्हणाले.

"जर त्यांच्या जागी एखादी निरपराध हिंदू भगिनी असती, तर मी त्यांना पाठिंबा दिला असता. हे लोक कायद्याबद्दल अनभिज्ञ आहेत. त्यांनी त्याचा अभ्यासही केलेला नाही. कायद्यानुसार, जोपर्यंत न्यायालय एखाद्या व्यक्तीला दोषी सिद्ध करत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती निर्दोष मानली जाते, पण इथे ते तिला आत्ताच दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते तिला दहशतवादी ठरवतात, पण प्रत्यक्षात काय घडले? टीसीएसच्या निवेदनाने हे स्पष्ट केले आहे की निदा खान एचआर प्रमुख नव्हत्या. त्या केवळ एक टेलि-रिस्पॉन्डर होत्या. खरे तर, एचआर प्रमुख एक गैर-मुस्लिम आहेत आणि त्यांना अटक करण्यात आली. याचा वापर करून संपूर्ण पक्षाला लक्ष्य करणे पूर्णपणे चुकीचे आहे. आम्हाला कायद्याची पूर्ण जाणीव आहे आणि आम्ही कायदेशीर मार्गाने पूर्ण प्रत्युत्तर देऊ, असेही ते म्हणाले.

Web Title : ओवैसी ओसामा जैसे, कोई अंतर नहीं: मंत्री नितेश राणे

Web Summary : मंत्री नितेश राणे ने असदुद्दीन ओवैसी की तुलना ओसामा बिन लादेन से की, और आरोप लगाया कि एआईएमआईएम एक आतंकवादी संगठन है। उन्होंने पीएफआई पर प्रतिबंध के समान एआईएमआईएम पर प्रतिबंध लगाने की मांग की, जिससे राजनीतिक विवाद पैदा हो गया। एआईएमआईएम की प्रतिक्रिया का इंतजार है।

Web Title : Owaisi is like Osama, no difference: Minister Nitesh Rane

Web Summary : Minister Nitesh Rane compared Asaduddin Owaisi to Osama bin Laden, alleging AIMIM is a terrorist organization. He demanded a ban on AIMIM, similar to the PFI ban, sparking political controversy. AIMIM's response is awaited.