हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 10:29 IST2026-05-11T10:27:16+5:302026-05-11T10:29:38+5:30

हंटाव्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या 'एमव्ही होंडियस' क्रूझवरील दोन भारतीय नागरिक सुखरूप आहेत. त्यांना नेदरलँडमध्ये हलवण्यात आले असून आरोग्य यंत्रणा त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.

Hantavirus outbreak! Indian citizens safely evacuated from cruise ship where 3 people died; What happens next? | हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?

हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?

जगभरात विविध व्हायरसने थैमान घातलेले असतानाच आता 'हंटाव्हायरस'च्या धोक्याने खळबळ उडवून दिली आहे. 'एमव्ही होंडियस' या क्रूझवर या व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, या क्रूझवर अडकलेल्या दोन भारतीय नागरिकांबद्दल आनंदाची बातमी समोर आली आहे. या दोन्ही भारतीयांना क्रूझवरून सुरक्षितरीत्या उतरवून आता नेदरलँडमध्ये नेण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती स्पेनमधील भारतीय दूतावासाने दिली आहे.

नेदरलँडमध्ये क्वारंटाईन, प्रकृतीवर लक्ष

स्पेनच्या कॅनरी बेटावर हे क्रूझ जहाज रविवारी पोहोचले. या जहाजावर १५० हून अधिक प्रवासी आणि चालक दल होते. जागतिक आरोग्य संघटना आणि स्पेनच्या आरोग्य विभागाने ठरवून दिलेल्या कडक प्रोटोकॉलनुसार सर्व प्रवाशांना क्रूझवरून खाली उतरवण्यात आले. यामध्ये चालक दलाचा भाग असलेल्या दोन भारतीय सदस्यांचा समावेश होता. त्यांना विशेष खबरदारी म्हणून नेदरलँडमध्ये पाठवण्यात आले असून, तिथे त्यांना विलगिकरणात ठेवले जाईल. सुदैवाने, या दोघांमध्येही सध्या व्हायरसची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.

३ जणांचा मृत्यू, ५ बाधित

हंटाव्हायरसचा हा प्रादुर्भाव अत्यंत घातक मानला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या संसर्गामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर पाच प्रवासी या व्हायरसने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. हंटाव्हायरसची लक्षणे सहसा संसर्ग झाल्यानंतर १ ते ८ आठवड्यांच्या दरम्यान दिसून येतात, त्यामुळे खबरदारी म्हणून सर्वांची तपासणी केली जात आहे.

भारतीय दूतावास अ‍ॅक्शन मोडमध्ये

स्पेनमधील भारताचे राजदूत जयंत एन. खोब्रागडे या प्रकरणावर स्वतः लक्ष ठेवून आहेत. दोन्ही भारतीयांच्या सुरक्षेबाबत आणि आरोग्याबाबत ते स्थानिक प्रशासन आणि क्रूझ कंपनीच्या सतत संपर्कात आहेत. "आपले नागरिक सुरक्षित असून त्यांना सर्व आवश्यक वैद्यकीय मदत आणि सुविधा पुरवल्या जात आहेत," असे दूतावासाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

काय आहे 'हंटाव्हायरस'?

हंटाव्हायरस हा प्रामुख्याने उंदीर आणि अशाच प्रकारच्या प्राण्यांच्या संपर्कात आल्याने पसरतो. या व्हायरसची लक्षणे सौम्य स्वरूपात आढळत असली तरी, वेळेवर उपचार न मिळाल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. एमव्ही होंडियस हे जहाज १ एप्रिल रोजी अर्जेंटिनाहून निघाले होते, त्यानंतर वाटेतच या व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले.

Web Title : क्रूज पर हंटावायरस का प्रकोप: 3 मौतों के बाद भारतीयों को निकाला गया

Web Summary : 'एमवी होंडियस' क्रूज जहाज पर हंटावायरस के प्रकोप से तीन लोगों की मौत हो गई। दो भारतीय नागरिकों को सुरक्षित रूप से नीदरलैंड ले जाया गया और क्वारंटाइन किया गया। उनकी हालत स्थिर है। भारतीय दूतावास उनकी भलाई सुनिश्चित करते हुए स्थिति की निगरानी कर रहा है और आवश्यक चिकित्सा सहायता प्रदान कर रहा है।

Web Title : Hantavirus Outbreak on Cruise: Indians Evacuated After 3 Deaths

Web Summary : A Hantavirus outbreak on the 'MV Hondius' cruise ship led to three deaths. Two Indian nationals were safely evacuated to the Netherlands and quarantined. Their condition is stable. The Indian embassy is monitoring the situation, ensuring their well-being and providing necessary medical assistance.