जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 10:40 IST2026-05-12T10:39:36+5:302026-05-12T10:40:54+5:30

रविवारी हे क्रूझ स्पेनमध्ये पोहोचल्यानंतर सर्व प्रवाशांना त्यांच्या देशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेच्या महासचिवांसह एक मोठे पथक घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी करत होते.

Three passengers on ship infected with hantavirus, including a woman | जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश

जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश

द हेग (एपी) : नेदरलँडच्या ‘एमव्ही होंडियस’ या क्रूझ शिपवर आणखी तीन प्रवाशांना हंटा व्हायरसची लागण झाल्याचे वा त्यासदृश लक्षणे असल्याचे समोर आले आहे. 

रविवारी हे क्रूझ स्पेनमध्ये पोहोचल्यानंतर सर्व प्रवाशांना त्यांच्या देशात पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अनेक प्रवाशांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या महासचिवांसह एक मोठे पथक घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी करत होते. सोमवारी मिळालेल्या माहितीनुसार एक फ्रेंच महिला आणि दोन अमेरिकी नागरिकांना या विषाणूची लागण झाल्याचे दिसून आले. 

स्पेनच्या कॅनरी बेटांवर हे जहाज नांगरल्यानंतर, रविवारपासून प्रवाशांना मायदेशी नेण्यास सुरुवात झाली होती. 

Web Title : क्रूज जहाज पर तीन यात्री हंटावायरस से संक्रमित; एक महिला भी शामिल

Web Summary : क्रूज जहाज 'एमवी होंडियस' पर तीन यात्री हंटावायरस से संक्रमित पाए गए हैं। संक्रमितों में एक फ्रांसीसी महिला और दो अमेरिकी नागरिक शामिल हैं। जहाज स्पेन पहुंचा, जहां से यात्रियों को क्वारंटाइन के बाद वापस भेजा जा रहा है। डब्ल्यूएचओ की टीम स्थिति की निगरानी कर रही है।

Web Title : Hantavirus infects three passengers on cruise ship; woman included.

Web Summary : Three passengers on the cruise ship 'MV Hondius' have contracted Hantavirus. A French woman and two American citizens are infected. The ship reached Spain, and passengers are being repatriated after being quarantined. A WHO team is monitoring the situation.