देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना नेमका कोणता आजार झाला आहे, याची अधिकृत माहिती सरकारनं 24 तासांच्या आता जाहीर करावी आणि मुख्यमंत्रिपदाचाही त्याग करावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. ...
वंचित समाज घटकांना आजपर्यंत विधानसभा, संसद बघायला मिळालेली नाही. या घटकांनाही संसद बघू द्या, असे आवाहन करत यापुढे कुणीही बहुजन समाजाला गृहीत धरु नये, असा इशारा ‘उपरा’कार व माजी आमदार लक्ष्मण माने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दोन्ही कॉंग्रेस व भाजपला दिला. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या कार्यक्रमासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीं यांना निमंत्रित केल्याची चर्चा सुरू आहे. मात्र राहुल गांधी किंवा काँग्रेसचे कुणी अन्य नेते संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ...
शहरात नगर परिषद अस्तित्वात आहे काय असा प्रश्न उपस्थित करीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी टाऊन हॉलसमोर ठिय्या आंदोलन केले. पालिकेची सर्वसाधारण सभा सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती. ...