सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 18:28 IST2026-05-12T18:28:13+5:302026-05-12T18:28:38+5:30
सुन तोकडे कपडे घालून रील तयार करत होती. तिचे असे वागणे सासू-सासऱ्यांना मान्य नव्हते. यावरून होणाऱ्या वादातून हा टोकाचा प्रकरा घडला....

सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
हरियाणातील पानिपत येथून एक धक्कादाक घटना समोर आली आहे. आधुनिक 'इंस्टाग्राम कल्चर' आणि जुन्या पिढीचे विचार यांच्यातील संघर्षाने अक्षरशः दोन बळू घेतले आहेत. आपल्या सुनेच्या दैनंदिन वागण्याला आणि जाचाला कंटाळून सासू-सासऱ्यांनी सल्फासच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली आहे. सुन तोकडे कपडे घालून रील तयार करत होती. तिचे असे वागणे सासू-सासऱ्यांना मान्य नव्हते. यावरून होणाऱ्या वादातून हा टोकाचा प्रकरा घडला.
ही घटना पानिपत जिल्ह्यातील नारा गावात घडली. राजेश (४६) आणि सुमन (४४) यांचा एकुलता एक मुलगा आशिष, याचे लग्न जानेवारी २०२५ मध्ये दिल्लीच्या स्नेहाशी झाले. स्नेहासोबत त्याची ओळख इंस्टाग्रामवरूनच झाली. नंतर त्याचे रूपांतर प्रेमात झाले आणि नतंर दोघांनी लग्न केले. मात्र, दिल्लीत वाढलेल्या स्नेहाची आधुनिक जीवनशैली आणि ग्रामीण भागातील सासू-सासरे यांचा ताळमेळ बसला नाही. तिचे तोडके कपडे घालून, रील बनवण्याचे वेड आणि सोशल मीडियावरील अतिसक्रियता, यावरून घरात सातत्याने वाद होत होते.
मुलाची पत्नीला साथ आणि छळ -
मृत राजेश आणि सुमन यांचा असा आरोप होता की, स्नेहा त्यांना मारहाणही करत होती. त्यातच भर म्हणून, आपला मुलगाही पत्नीची बाजू घेऊन आई-वडिलांना अपमानित करायचा. यामुळे राजेश आणि सुमन हे दोघेही अत्यंत अस्वस्थ होते. त्यांच्या घरात शनिवारी दुपारी पुन्हा वाद झाला. यानंतर नैराश्यातून राजेश आणि त्यांची पत्नी सुमन यांनी सल्फास खाल्ले. प्रकृती खालावल्यानंतर, कुटुंबीयांनी दोघांनाही पानिपत सिव्हिल रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात दाखल होताच सुमन यांना मृत घोषित करण्यात आले. तर राजेश यांना रोहतक पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले, परंतु रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. याप्रकरणी मतलौडा पोलिसांनी स्नेहा, तिचे आई-वडील आणि बहीण अशा चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे.