देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काँग्रेसची युतीची बोलणी बारगळलेले पश्चिम बंगाल एकमेव राज्य नसून दिल्लीत देखील अशीच स्थिती आहे. दिल्लीतील आम आदमी पक्षासोबतची काँग्रेसची युतीची बोलणी फिसकटली आहे. ...
उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात काँग्रेस पक्षाशी आमचा काही संबंध नाही, काँग्रेस आणि आमच्यात कोणत्याही तडजोडी अथवा आघाडी नाही, हे बहुजन समाज पार्टी नेत्या मायावती यांनी स्पष्ट केले आहे ...
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांची पाचवी टर्म चुकविण्यासाठी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र काँग्रेसला यावेळीसुद्धा अंतर्गत लाथाड्यांचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. ...
उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडीने काँग्रेससाठी अमेठी व रायबरेली मतदारसंघात उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसनेही सपा-बसपाच्या सात मतदारसंघांत आपले उमेदवार न देण्याचे ठरविले आहे. ...
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडात लोकसभा उमेदवारीवरुन काँग्रेस आणि भाजपा दोघेही वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत आहेत़ काँग्रेसकडून खुद्द प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण, आ़अमिता चव्हाण तर भाजपाकडून आ़प्रताप पाटील चिखलीकर, मीनल खतगावकर यांच्या नावाची ...