देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मुंबई उत्तर मतदार संघात २८ टक्के मराठी मतदार आहेत. यातील बहुतांशी मते ही शिवसेनेला मिळतात. आता हा मतदार संघ भाजपला मिळाला असून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी निवडणूक लढवत आहे. या मतदार संघात मराठीचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. ...
अरविंद शिंदे यांनी बुधवारी रात्री उमेदवारी मिळाल्याचे सत्कार स्विकारल्यानंतर शुक्रवारी दिवसभरात एकदाही त्यांच्या नावाची पक्षाकडून अधिकृत घोषणा झाली नाही. ...
'न्याय' योजना अर्थात गरीब कुटुंबाला महिन्याला किमान १२ हजार रुपयांच्या उत्पन्नाच्या हमी योजनेची कल्पना आपणच काँग्रेसला दिली होती, असंही राजन यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राजन यांची जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ...
रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उर्मिला यांची लढत भाजपाचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या बरोबर होणार आहे. ...