आयपीएल २०२६ स्पर्धेत पहिल्या सात सामन्यात अपराजित राहिलेल्या पंजाब किंग्सच्या संघाला आठव्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं पराभवाचा धक्का दिला. पंजाब किंग्सविरुद्ध विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सनं खेळलेली एक चाल सामन्याला कलाटणी देणारी ठरली. इथं जाणून घेऊयात नेमकं काय घडलं? RR चा कोणता निर्णय PBKS शह देणारा ठरला? यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना धमाकेदार सुरुवात
न्यू चंडीगड येथील मुल्लानपूरच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या सामन्यात पंजाब किंग्सच्या संघाने प्रभसिमरन सिंगच्या आश्वासक अर्धशतकासह ५९ (४४) मार्कस स्टॉयनिसच्या ६२ (२२) वादळी खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २२२ धावा करत राजस्थान रॉयल्ससमोर विक्रमी २२३ धावांचे टार्गेट सेट केले होते. यंदाच्या हंगामातच पंजाबने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध २२० धावांचा यशस्वी पाठलाग करुन दाखवला होता. या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्ससकडून वैभव सूर्यवंशी ४३ (१६) आणि यशस्वी जैस्वालनं ५१ (२७) संघाला दमदार सुरुवात करून दिली.
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
चहलच्या फिरकीचा जादू दिसली अन् मॅच PBKS च्या बाजून झुकली
अर्शदीप सिंगनं वैभव सूर्यवंशीच्या रुपात राजस्थानला पहिला धक्का दिल्यावर युजवेंद्र चबल पिक्चरमध्ये आला त्याने सेट झालेल्या यशस्वी जैस्वाल आणि मॅचला कलाटणी देण्याची क्षमता असलेल्या ध्रुव जुरेलला आपल्या जाळ्यात अडकवले. १४ व्या षटकात पंजाब किंग्सने १५१ धावांवर ४ विकेट्स गमावल्यावर सामना पंजाब किंग्सच्या बाजूनं झुकला होता.
विदर्भकाराचा इम्पॅक्ट! RR च्या चाल PBKS वर पडली भारी
अखेरच्या ३६ चेंडूत ७२ धावांची गरज असताना राजस्थान रॉयल्सच्या संघाने मॅचविनर ऑलराउंडर रवींद्र जडेजाला मागे ठेवत डोनोव्हन फरेराच्या साथ देण्यासाठी इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात शुभम दुबेला मैदानात उतरवले. हा निर्णय थोडा आश्चर्यचिकत करणारा होता. पण ही चाल एकदम परफेक्ट ठरली. ही जोडी जमली आणि दक्षिण आफ्रिकेच्या फरेराला विदर्भकराने उत्तम साथ देत RR च्या संघात एका वेळी दोन तगड्या फिनिशरची झलक पाहायला मिळाली. फरेरानं २६ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २०० च्या स्ट्राईक रेटसह ५२ धावांची नाबाद खेळी करून सामन्याचा हिरो ठरला. दुसरीकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भ संघाकडून आपल्या स्फोटक फलंदाजीची झलक दाखवून RR च्या ताफ्यात सामील झालेल्या शुभम दुबेनं १२ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २५८.३३ च्या स्ट्राईक रेटसह नाबाद ३१ धावांची खेळी करत आपल्यातील पॉवर हिटिंगची क्षमता दाखवली. या जोडीनं ३२ चेंडूत ७७ धावांच्या भागीदारीसह सामन्याला कलाटणी दिली.