देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
अकोल्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता हळूहळू रंग धरत आहे. मतदारांचा कानोसा अन् राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला तर अकोल्यातील भाजपा सध्या ‘हवेत’ असल्याचे स्पष्ट होते. ...
अकोला : आचारसंहिता लागू असताना विनापरवानगी सभा घेणे काँग्रेसला महागात पडले आहे. येथील अकोट फैल भागात आपातापा चौकात गुरुवार, ४ एप्रिल रोजी विनापरवानगी सभा घेतल्याने काँग्रेसपक्षा विरुध्द आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जाहिरातीच्या एकूण खर्चात एकट्या भाजपने १.२१ कोटी रुपये गुगल जाहिरातींवर खर्च केला आहे. गुगलवरील जाहिरातीत भाजपचे प्रमाण ३२ टक्के आहे. या यादीत प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस गुगलवरील जाहिरातीच्या बाबतीत सहाव्या स्थानी आहे. ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारा अभिनेता सुबोध भावे आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात हा गमतीशीर किस्सा घडलाय ...