देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
सिन्हा यांच्या स्वभावातच धोका देणे आहे. त्यांनी १५ दिवसांच्या आतच काँग्रेसला धोका दिला. पत्नीसाठीचा मोह त्यांना आवरता आला नसून काँग्रेसमध्ये सामील झालेले सिन्हा बायकोसाठी समाजवादी पक्षाच्या रॅलीत सामील झाल्याचे पांडे यांनी म्हटले. ...
बाटला हाऊस संदर्भात काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित करणं हा त्या चकमकीत शहीद झालेल्या जवानाचा अपमान नाही का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला केला आहे. ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर भाजपाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. राहुल गांधी हे भारतीय नागरिक आहेत की ब्रिटिश नागरिक असा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी विचारला आहे. ...
काही दिवसांपूर्वी प्रियंका मथुरेत गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मथुरेतून राफेलसंदर्भातील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. तेव्हा त्यांना पक्षातील कार्यकर्त्यांकडून वाईट वागणूक देण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर अक्षेपार्ह टीका देखील झाली होती. ...