बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का

Ben Stokes Face after Surgery Photos: बेन स्टोक्स आधीपेक्षा खूपच वेगळा दिसू लागला आहे

इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान जखमी झाला होता आणि त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर पहिल्यांदाच त्याने माध्यमांसमोर हजेरी लावली.

या वर्षाच्या सुरुवातीला, नेट सेशनदरम्यान स्टोक्सच्या चेहऱ्यावर चेंडू लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळेच त्याच्यावर चेहऱ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

बेन स्टोक्सचा चेहरा शस्त्रक्रियेनंतर खूपच बदललेला दिसत आहे. बेन स्टोक्सने चेहऱ्याची सर्जरी केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे, ज्याची झलक पाहून क्रिकेटचाहत्यांनाही खूपच धक्का बसला आहे.

इंग्लंड क्रिकेटच्या एका कार्यक्रमात त्याची झलक दिसली. त्यात स्टोक्सचा चेहरा आधीपेक्षा खूप जास्त बारीक दिसला. यापूर्वी तो कधीही इतका बारीक दिसला नव्हता, त्यामुळे अधिकच चर्चा रंगली.

इंग्लंड क्रिकेटच्या व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओत क्रिकेट चाहत्यांचे संपूर्ण लक्ष बेन स्टोक्सच्या नव्या दिसणाऱ्या चेहऱ्याने वेधून घेतले. स्टोक्समधील बदल दाखवणारे फोटो व्हायरलही झाले.

स्टोक्सने बीबीसी स्पोर्टला सांगितले, "घडलेला प्रकार खूप भीतीदायक होता. चेंडू थेट माझ्या चेहऱ्यावर लागला. जर तो काही इंच फिरला असता, तर कदाचित मी आज इथे मुलाखती देत ​​नसतो."

"माझ्या गालाच्या हाडाखालील सर्व काही खराब (Damage) झाले होते. मी खूप नशीबवान होतो. सुदैवाने, फार गंभीर इजा झाली नाही. आता सर्व काही ठीक आहे आणि मी पुन्हा तंदुरुस्त आहे," असे स्टोक्स म्हणाला.