KL Rahul Fastest Century : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर केएल राहुलनं पंजाब किंग्स विरुद्ध यंदाच्या हंगामातील आपले पहिले शतक झळकावले. १२ धावांवर शशांक सिंग याने झेल सोडल्यावर मिळालेल्या संधीचा फायदा घेत अवघ्या ४७ चेंडूत लोकेश राहुलनं आपल्या IPL कारकिर्दीतील जलद शतकाचा विक्रम नोंदवला. दिल्ली कॅपिटल्सकडून कोणत्याही बॅटरनं केलेले हे जलद शतक ठरले. आयपीएलमधील त्याचे हे सहावे शतक आहे. या कामगिरीसह त्याने सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या ख्रिस गेलच्या विक्रमाचीही बरोबरीचा डाव साधला आहे.
धोनीसह रैनाला टाकले मागे
KL राहुलनं शतकाला गवसणी घालण्याआधी त्याने सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत महेंद्रसिंह धोनी (५४३९) आणि सुरेश रैना (५४३९) यांना मागे टाकले. विराट कोहली (८९८९), रोहित शर्मा (७१८३), शिखर धवन (६७६९), डेविड वॉर्न (६५६५) यांच्यानंतर तो पाचव्या स्थानावर आहे.